वैभव सोनवणे, प्रतिनिधी
पुणे, 04 मे : पुण्यात आगीची भयानक घटना घडली आहे. एका दुकानात अचानक आग लागली होती. आगीनंतर अचानक भीषण असा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की स्फोटात इमारतीची पडझड झाली आहे. या स्फोट 2 जण जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका इमारतीतील 03 दुकानांमधे मोठ्या प्रमाणात आग लागली होती. होम अप्लायन्स, किचन अप्लायन्स आणि मोबाईल शॉपीची अशी दुकाने होती.
तुमच्या शहरातून (पुणे)
पुण्यातील सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुकानात आगीनंतर स्फोट pic.twitter.com/Vnkvc1STX4
— News18Lokmat (@News18lokmat) May 4, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.