रायचंद शिंदे,शिरुर, 29 एप्रिल : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरेगाव भीमा येथे सहावीत शिकणारी 14 वर्षे वयाची विद्यार्थिनी गरदोर असल्याचा खळबजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित विद्यार्थीनी अत्याचाराने गरोदर राहिल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात युवकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव येथे सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या पोटात दुखत असल्याने तिला उपचारासाठी गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी पोटात दुखण्याचे कारण सांगितल्याने विद्यार्थिनीच्या कुटुंबियांना हादरा बसला. यावेळी विद्यार्थिनी गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान विद्यार्थिनीवर उपचार सुरू करण्यात आले आणि उपचार सुरू असताना विद्यार्थिनीच्या आईसह अन्य नातेवाईकने तिला विश्वासात घेत विचारपूस केली.
तुमच्या शहरातून (पुणे)
कोरेगाव भीमा येथे त्यांच्या घराशेजारील राहणाऱ्या युवकाने अत्याचार केले. दुकानातून घरी येताना तिला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्यानंतर कोणाला काय सांगितले तर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली असल्याने विद्यार्थिनीने आईला सांगितले. या विद्यार्थिनीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात युवकावर गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.