पुणे, 28 मार्च : राज्यात कोरोनाची लाट ओसली आहे. मात्र आता त्यानंतर H3N2 व्हायरसने डोकं वर काढलं आहे. राज्यात H3N2 व्हायरसचे रुग्ण आढळले असून आता मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका H3N2 रुगाणाचा मृ्त्यू झाला आहे. आता राज्यातील H3N2 बळींची संख्या चारवर पोहोचली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 चा दुसरा बळी गेला आहे. H3N2 ची लागण झालेल्या एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिला इतरही अनेक आजार होते. पिंपरी-चिंचवडमध्ये H3N2 चा 12 दिवसांत झालेला हा दुसरा मृत्यू आहे. याआधी 16 मार्चला एच 3 एन 2 विषाणूची लागण झालेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. हा 73 वर्षीय वृद्ध अनेक आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
राज्यात H3N2 चा कहर! घेतले 3 बळी; कसा वाचवाल तुमचा जीव? डॉक्टरांनी सांगितले बचावाचे 5 उपाय
तुमच्या शहरातून (पुणे)
पुण्याशिवाय अहमदनगर आणि नागपूरमध्येही H3N2 बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगरमधील मृत रुग्ण मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. सोबतच तपासणीमध्ये त्याला H3N2 व्हायरसची देखील लागन झाल्याचं समोर आलं होतं. तर नागपुरात एका खासगी रुग्णालयामध्ये एका 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेहासह इतर उच्चरक्तदाबाचा त्रास होता.
काय आहे H3N2?
H3N2 हा विषाणू इन्फ्युएनजा विषाणूंचा उपप्रकार आहे. ह्या विषाणूचा फैलाव लवकर होत आहे. लोकांच्या शिंकेवाटे आणि खोकल्यावाटे या विषाणूचा प्रसार होत आहे. हा हा विषाणू नाक तोंडावाटे फुप्फुसापर्यंत जातो आणि माणसाला संसर्ग होतो. सुरुवातीला सर्दी होणे खोकला येणे अंग दुखणे असे लक्षण दिसतात. आणि हा जो विषाणू संसर्ग अति प्रमाणात शरीरात झाल्यात निमोनिया देखील होतो. निमोनिया हेच या विषाणूचे बलस्थान आहे.
तरुण मुलाला अल्झायमर? संशोधक घेतायत आनुवंशिक कारणांचा शोध
1968 साली या विषाणूची जागतिक साथ आली होती. या साथीमध्ये त्या वेळेमध्ये अनेक लोकांना रुग्णालयात भरती करावे लागले होते एवढी ही गंभीर साथ आहे. सर्वात घातक असा विषाणूचा उपप्रकार आहे.
H3N2 ची लक्षणं
ताप, थंडी, खोकला, मळमळ, उलटी, घशात दुखणे, अंगदुखी, सर्दी, वाहणारं नाक, श्वास घ्यायला त्रास, छातीत अस्वस्थ वाटणं, काही प्रकरणात डायरिया ही याची लक्षणं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.