संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी
छपरा, 13 एप्रिल : बिहारच्या सारण जिल्ह्यातील मधौरा पोलीस स्टेशन हद्दीतील नेरुआ गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढून तिचे लग्न मोडल्याची घटना घडली. इतकेच नाही तर तिचे लग्न मोडण्यासाठी तिचे आक्षेपार्ह फोटो तिच्या भावी सासरच्या घरीही पाठवण्यात आले. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
या घटनेत मुलीच्या बाजूचे 4 जण जखमी झाले आहेत. त्यात एका महिलेचा समावेश आहे. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुलीच्या दूरच्या नात्यातील काकाने गावातील एका मुलीला दारूच्या नशेत आक्षेपार्ह फोटो क्लिक केले आणि ते फोटो तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठवले. त्यामुळे मुलीचे लग्न मोडले.
याची माहिती मिळताच मुलीच्या कुटुंबीयांना राग आला आणि त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन तक्रार केली. फिर्याद देताना दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. तसेच या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेत ३ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.
आरोपी तरुणाचे नाव गुड्डू कुमार आहे. तसेच तो गावातील ओमप्रकाश याचा मुलगा असल्याचे सांगितले जात आहे. गावातील लोकांचे म्हणणे आहे की, मुलीच्या कुटुंबाशी गुड्डूचा पूर्वीपासून जमिनीचा वाद सुरू होता. या वादातून त्याने ही घटना घडवली आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी तणाव कायम आहे. तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मुलीचा भाऊ भोला कुमार याने सांगितले की, त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. परंतु पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचले नाहीत. नंतर पोलीस पोहोचले आणि प्रकरणाचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.