लखनऊ, 21 मे : उत्तर प्रदेशात अलीगढमध्ये पुतण्याने काकाची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून पुतण्याने वृद्ध काकांची हत्या केली. ही घटना क्वार्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवसैनी इथं घडली. अलीगढच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी यांनी सांगितलं की, मृत्यू झालेले रामजीलाल उत्तर प्रदेश पोलिसात कार्यरत होते. ते मुळचे बुलंदशहर इथं राहत होते.
खूनाच्या घटनेआधी एक दिवस रामजीलाल आणि त्यांचा पुतण्या राहुल यांच्यात काही कारणांनी वाद झाला होता. यावेळी राहुलने रामजीलाल यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घरात संशयास्पदरित्या रामजीलाल यांचा मृत्यू झाल्याचं दाखवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.