मुंबई, 17 एप्रिल : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगातील एक षष्ठांश लोकसंख्येला अॅनिमियाचा त्रास आहे. ही समस्या महिलांमध्ये अधिक आढळते, तर आपल्या देशात दर तीनपैकी एक महिला अशक्तपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. वास्तविक जेव्हा शरीराच्या पेशींना सक्रिय राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते, तेव्हा लाल रक्तपेशींमध्ये असलेले हिमोग्लोबिन प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. परंतु जेव्हा शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिनचे उत्पादन प्रभावित होते. तेव्हा शरीर आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होऊ लागतो. याला अॅनिमिया म्हणतात.
महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमुख कारण
मायोक्लिनिकच्या मते, महिला दर महिन्याला मासिक पाळीतून जातात. जेव्हा शरीरातून जास्त प्रमाणात रक्त गळती होते. तेव्हा महिलांमध्ये लोहाची कमतरता आणि अॅनिमियाचा धोका वाढतो. एवढेच नाही तर गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीमुळे महिलांमध्ये अॅनिमिया होतो. अशा परिस्थितीत जर त्यांनी सकस आहार घेतला नाही आणि त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार लोह इत्यादींचा पुरवठा होत नसेल तर ही समस्या अधिक धोकादायक रूप धारण करू शकते.
या 5 भाज्या खाल तर लिव्हर राहील मजबूत आणि निरोगी! शरीर बनेल कणखर, आजार राहतील दूर
अॅनिमियाची लक्षणे
1. रक्ताच्या कमतरतेमुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते.
2. शरीरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अधिक थकवा जाणवतो.
3. त्वचेचा रंग पिवळा किंवा पांढरा होऊ लागतो आणि डोळ्यांभोवतीचा भाग काळा होऊ लागतो.
4. शरीरात ऊर्जेची कमतरता असते आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
5. हृदयाचे ठोके जलद राहतात आणि रक्तदाब कमी राहतो.
6. मनःस्थिती बदलते आणि उदासीनता जाणवते.
7. भूक न लागणे आणि वारंवार चक्कर येणे.
8. हात पाय थंड पडतात, हलकी डोकेदुखी जाणवते.
9. नखे तुटायला लागतात आणि त्वचेचे फ्लेक्स बाहेर पडत राहतात.
अॅनिमिया साठी घरगुती उपाय
– बीटरूटचा रस प्यायल्याने अॅनिमियाची समस्या दूर होऊ शकते.
– तुमच्या आहारात पालक, केल यांसारख्या लोहयुक्त हिरव्या भाज्यांचा अधिकाधिक समावेश करा.
– रोज सकाळी नाश्त्यात दोन ते तीन खजूर आणि 10-12 दाणे मनुके खा.
– रोज पाण्यात भिजवलेले हरभरे गुळासोबत खावे. गूळ आणि हरभरा यामध्ये भरपूर लोह असते.
उन्हाळ्यात अनेक इन्फेक्शनशी लढण्यास मदत करेल बडीशेपचा चहा! वाचा 6 जबरदस्त फायदे
हे सर्व उपाय केल्यानंतरही तुम्हाला त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.