मुंबई, 28 एप्रिल : कॅन्सर अर्थात कर्करोग हा गंभीर स्वरूपाचा आणि जीवघेणा आजार आहे. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. कॅन्सरचा प्रकार कोणताही असला, तरी त्याचं पहिल्या टप्प्यात निदान झालं तर उपचारांच्या माध्यमातून रुग्णाला दिलासा मिळू शकतो. कॅन्सरचे काही प्रकार केवळ पुरुषांमध्येच दिसून येतात. प्रोस्टेट कॅन्सर हा त्यापैकी होय. हा कॅन्सर सर्वसामान्यपणे वृद्धापकाळात होतो. प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय, त्याचं निदान कसं होतं आणि त्यावरचे उपचार कोणते याविषयीची माहिती घेऊ या. बेंगळुरू इथल्या फोर्टिस हॉस्पिटलचे युरोलॉजी, युरो-ऑन्कोलॉजी, अँड्रोलॉजी, ट्रान्सप्लांट अँड रोबोटिक सर्जरी विभागाचे संचालक आणि रीनल सायन्सेस स्पेशालिटी कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. मोहन केशवमूर्ती यांनी दिली आहे.
पुरुषांमधलं कॅन्सरचं दुसरं सर्वसाधारण कारण ठरणारा प्रोस्टेट कॅन्सर हा जागतिक स्तरावर पुरुषांमधल्या कॅन्सरशी संबंधित मृत्यूचं सहावं प्रमुख कारण आहे. आपल्या देशात वाढत्या आयुर्मानामुळे प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण लक्षणीय वाढण्याची शक्यता व्यक्त होते. प्रोस्टेट कॅन्सर होण्याचा धोका वयानुसार वेगानं वाढतो. प्रोस्टेट कॅन्सरच्या एकूण रुग्णांपैकी सुमारे 70 टक्के पुरुष रुग्ण 60 वर्षांवरचे असल्याचं दिसून येतं.
प्रोस्टेट कॅन्सरचं निदान लवकर झालं तर संबंधित रुग्णावर नर्व्ह स्पेअरिंग रोबोटिक प्रोस्टेटक्टोमायटेक्निकच्या मदतीने यशस्वीरीत्या उपचार केले जाऊ शकतात. काही केसेसमध्ये आजार सौम्य असेल आणि त्याची प्रगती संथ असेल तर रुग्ण किमान औषधांच्या मदतीने अनेक वर्षं जगू शकतो. प्रोस्टेट कॅन्सरची कोणतीही विशिष्ट लक्षणं दिसत नसल्याने स्टँडर्ड क्लिनिकल गाइडलाइन्सच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पुरुषांना दर वर्षी Serum PSAEvaluation करण्याचा सल्ला दिला जातो. प्रोस्टेट कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास असल्यास 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांनी वार्षिक Serum PSAEvaluation करावं.
पीएसए वाढला असेल तर त्याच्या व्यवस्थापनासाठी रुग्णाला अँटिबायोटिक्सचा कोर्स दिला जातो. अँटिबायोटिक्स घेऊनही पीएसए वाढला असेल किंवा दोन आठवड्यानंतरही त्याचा कल वाढता असेल तर त्यासाठी फ्री पीएसए, पीएस व्हेलॉसिटी आणि पीएसए डेन्सिटीसारख्या तपासण्या केल्या जातात. यावरून कॅन्सरची शक्यता पडताळली जाते. कॅन्सरची लक्षणं दिसत असतील तर ट्रान्सरेक्टल अल्ट्रासाउंड किंवा TRUS बायोप्सीचा सल्ला दिला जातो. हे एक निदान तंत्र आहे. प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झालं की त्याची वर्गवारी करून स्टेज निश्चित करावी लागते.
त्यानंतर नपुंसकत्वासारखी गुंतागुंत टाळण्यासाठी नर्व्ह स्पीयरिंग रोबोटिक रॅडिकल प्रोस्टेटक्टॉमी करताना ऑर्गन कॉन्फिडेट इंटीमिडेट ग्रेडच्या कॅन्सरवर सर्वोत्तम उपचार केला जातो. अन्य शस्त्रक्रियांच्या तुलनेत ही प्रक्रिया सर्वोत्तम मानली जाते. हायर ग्रेड कॅन्सर किंवा अॅडव्हान्स कॅन्सर असलेल्या रुग्णांना बहुविध व्यवस्थापनाची आवश्यकता असते.
ग्लेसन ग्रेड
ग्रेड ग्रुप : ग्लेसन स्कोअर कॅन्सर ग्रेड
6 किंवा त्यापेक्षा कमी : लो ग्रेड कॅन्सर
3+4=7 : मीडियम ग्रेड कॅन्सर
4+3=7 : अधिक असामान्य पेशींसह मीडियम ग्रेड कॅन्सर
8 : हाय ग्रेड कॅन्सर
9-10 : हाय ग्रेड कॅन्सर
अॅडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सर ट्रीटमेंटचे पर्याय
उपचारांच्या नियोजनासाठी तपासणीच्या पद्धती
1 पीएसएमए पेट स्कॅन
2 पेल्विस एमआरआय वुइथ पायरॅड स्कोअरिंग
3 अनिश्चित केसेसाठी बीके-एम आर फ्युजन बायोप्सी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.