भोपाळ, 09 मे : मध्य प्रदेशात खरगोन इथं सकाळी भीषण दुर्घटना घडली. 50 फूट उंच पुलावरून नदीत बस कोसळली. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमी लोकांना खरगोनच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
खरगोन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांनी सांगितले की, बस पुलावरून कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी आहे. बचावकार्य सुरू आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी या घटनेनंतर शोक व्यक्त केलाय. बस रेलिंग तोडून नदीत कोसळली. पाणी नसलेल्या नदीत बस कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झालाय. तर 20 ते 25 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अनैतिक संबंधाने घेतला सहा वर्षाच्या चिमुकल्याचा बळी, आईसह प्रियकराला अटक
मंगळवारी सकाळी बस बोराड नदीच्या पुलावरून कोसळली. नदीत पाणी नसल्याने यात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. मृतांचा आकडा २० पर्यंत वाढण्याचीही शक्यता आहे. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. जखमींना खासगी वाहनांमधून स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत रुग्णवाहिका न पोहोचल्याने जखमींच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
बस शारदा ट्रॅव्हल्सची असून खरगोनहून इंदौरला जात होती. ही दुर्घटना खरगोन ठिकरी मार्गावर झाली. बस नदीच्या पुलावरून जात होती. तेव्हा नियंत्रण सुटून रेलिंगवर आदळली. रेलिंग तोडून बस नदीत कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. बसमध्ये 40 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.