जुगल कलाल (डुंगरपूर), 19 एप्रिल : तुम्हाला कधी पोटात दुखल्याचा त्रास होतोय का? तर याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कारण राजस्थानमध्ये एका वृद्ध स्त्रीच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्या वृद्ध महिलेला वारंवार पोटदुखीचा त्रास होत होता. तिने अनेक चाचण्या केल्या परंतु त्यातून काही निदान लागत नव्हते. दरम्यान तीने शेवटची चाचणी सोनोग्राफी केल्यानंतर तीच्या पोटात भली मोठी गाठ असल्याचे निदर्शनास आले. परंतु ती महिला इतकी अशक्त होती की तिच्यावर लवकर शस्त्रक्रीया करणे अवघड होत होते. पण त्या वृद्ध महिलेच्या वेदना पाहून डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेतला आणि पोटातून ही गाठ बाहेर काढली तेव्हा त्याचे वजन आणि आकार थक्क करणारा होता.
डुंगरपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. मोनिका डामोर यांनी सांगितले की, 8 एप्रिल रोजी लाजवंती रोट या 78 वर्षीय महिला पोटदुखीची तक्रार घेऊन आल्या होत्या. यावेळी त्यांचे हिमोग्लोबिन खूपच कमी असल्याने सर्व तपासण्यांनंतर 3 युनिट रक्त चढवण्यात आले. यानंतर त्यांची शस्त्रक्रीया करण्यात आली.
उष्माघातापासून वाचण्यासाठी काय कराल? बीएमसीकडून मार्गदर्शक तत्त्व जारी
सुमारे 2 तास चाललेल्या ऑपरेशननंतर महिलेच्या पोटातून 5 किलो वजनाचा मोठा गोळा बाहेर काढण्यात आला. एवढा मोठा गोळा पाहून डॉक्टरच नव्हे तर स्टाफलाही आश्चर्य वाटले. त्या महिलेच्या पोटात हा गोळा आकाराने मोठा होत होता. त्यामुळे वृद्ध महिलेला त्रास होत होता.
डॉ. मोनिका परमार म्हणाल्या की, हिमोग्लोबीन कमी होण्यासोबतच महिलेच्या अशक्तपणामुळे त्या महिलेस दुसऱ्या रुग्णालयात पाठण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु सर्व डॉक्टरांनी मिळून येथे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिच्यावरील शस्त्रक्रीया यशस्वी झाली आहे आता ती महिला पूर्णपणे बरी आहे.
महिलांच्या पँटीवर पांढरा-पिवळा असा डाग का दिसतो?
ही शस्त्रक्रिया डॉ.मोनिका परमार तसेच डॉ.विक्रम ग्रेसिया, डॉ.अरिहंत ताटेर, डॉ.दीपक घोघरा, डॉ.गजेंद्र कलाल, डॉ.ललित, डॉ.शिवानी, डॉ.चिंग, डॉ.विनिता, डॉ. जहांगीर, नीलम, ब्रिजेश आणि विशाल यांच्या टीमने पार पाडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.