प्रियांक सौरभ (मुझफ्फरपूर), 19 एप्रिल : बिहारमधील मोतीपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाबळ कुशाहा गावात राहणाऱ्या काजल कुमारी या महिलेची पतीकडूनच हत्या करण्यात आली आहे. प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा अवघ्या सहा महिन्यात खून केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी काजलच्या छातीत 3 गोळ्या झाडण्यात आल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हत्येच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या काजलच्या नातेवाईकांनी मृतदेहावर पतीच्या दारातच अंत्यसंस्कार केले आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, काजल तीन महिन्यांची गर्भवती होती परंतु तिच्यावर सासरच्यांकडून रोज हुंड्यासाठी छळ होत होता.
प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर चोरून घरी भेटायला गेला अन् खोलीत असताना…
तुमच्या शहरातून (गोवा)
यावरून वाद झाल्याने पतीकडून तिची थेट गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यावर काजलच्या घरच्यानी चिडून पतीच्य दारातच तिचे अंत्यसंस्कार केले. ज्यावेळी आम्ही या दारातून जाऊ त्यावेळी आम्हाला या घराबद्दल संताप येण्यासाठी हे कृत्य केल्याचे मुलीच्या नातेवाईकांनी सांगितलं.
मोतीपूरच्या कुशाहा गावात राहणाऱ्या आकाशने काजल नावाच्या तरुणीसोबत प्रेम होते. यानंतर त्यांनी 6 महिन्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर काजल तिच्या सासरच्या आकाशच्या घरी राहत होती. यावेळी काजलची आई नीलम देवी म्हणाल्या की, लग्नानंतर काही दिवस सर्व काही सुरळीत चालले होते.
मात्र नंतर काजलला हुंड्यासाठी तगादा लावू लागले. दरम्यान, काजल तीन महिन्यांची गरोदर राहिली. हुंड्याची मागणी करत तिला मारहाणही केली जात होती. तिच्याकडे 10 लाख आणि 4 चाकी वाहनाची मागणी करण्यात येत होती.
स्वत:चा जीव धोक्यात घालून सहकाऱ्यांना वाचवलं, वाशिमच्या जवानाला वीरमरण
काजलचा भाऊ अमन याने सांगितले की, बहिणीच्या आनंदासाठी आम्ही जमीन विकून सासरची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. असे असतानाही ते काजलवर अत्याचार करायचे. दरम्यान, आकाशने मित्रांसोबत येऊन किचनमध्ये काम करणाऱ्या काजलच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या, त्यात ती जागीच ठार झाली. यानंतर आरोपी पती फरार आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.