राजस्थान, 22 मे : राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे चोरीला गेलेली गाय तिच्या खऱ्या मालकापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांनी चक्क गायीची डीएनए चाचणी केली. डीएनए चाचणीच्या मदतीने पोलिसांना गायीचा खरा मालक सापडला.
गायीची डीएनए टेस्ट केल्याची घटना राजस्थानच्या सरदारशहर तहसीलमधली आहे. येथे एका गायीवरून दोन पशुपालकांमध्ये वाद झाला होता. या दोघांनीही संबंधित गाय स्वतःची असल्याचा आहे असा दावा केला होता. याबाबत एका पशुपालका विरुद्ध पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल देखील दाखल करण्यात आला होता. तेव्हा गाईच्या खऱ्या मालकाचा शोध कसा घ्यायचा, याबाबत पोलिस देखील संभ्रमात पडले होते.
सरदारशहरच्या रामनगर बास येथील वॉर्ड 1 मध्ये राहणारे पशुपालक दुलाराम दारा यांची गाय 18 महिन्यांपूर्वी चोरीला गेली होती. तेव्हा याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने वृद्ध दुलाराम यांनी सहा महिन्यांपूर्वी टॉवरवर चढून आपली व्यथा मांडली होती. योगायोगाने त्याच दिवशी मुख्यमंत्री अशोक गेहलोत पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी चुरू येथे आले होते. तेव्हा आयजी बिकानेर यांनी गाई चोरी प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी तारानगर डीएसपी ओमप्रंकश गौडारा यांच्यावर सोपवली. यानंतर ही गाय नेमकी कोणाची आहे, हे समजण्यासाठी पोलिसांनी तपास सुरु केला.
पशुपालक दुलारामने यांनी पोलिसांना सांगितले की, चोरलेल्या गायीची आई माझ्या गोठ्यात आहे. माझ्या गायीचे वासर बळजबरीने कोणी तरी चोरून नेले आहे. दुलारामच्या गोठ्यात असलेलया गायीची डीएनए चाचणी पोलिसांनी केली. गायीची डीएनए चाचणी राजस्थानमध्ये होत नसल्याने ही चाचणी करण्यासाठी गायीचा डीएनए हैदराबादला पाठवण्यात आला. डीएनएचा रिपोर्ट आल्यानंतर ही गाय दुलाराम यांचीच असल्याचे समोर आले. पोलिसांनी गाय तिच्या मालकाकडे सुपूर्द केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.