पुणे, 1 मे : नो पार्कींगमध्ये उभी असलेले वाहन टोइंग करताना अनेकदा वाद होतात. अशा वादाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. आता असाच एक व्हिडीओ पुण्यातून समोर आला आहे. शहरात टोइंग व्हॅन कर्मचारी व दुकानदार यांच्यात जोरदार भांडण झालं. दुकानदाराने धक्का देत कर्मचाऱ्यांवर विट उगारली. याच रागातून कर्मचाऱ्यांनी महिला पोलिसांसमोर दुकानदाराला कपडे फोटेपर्यंत मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार हडपसर मधील महादेवनगर परिसरात घडला आहे.
Video : पोलिसांसमोर टोइंग व्हॅन कर्मचाऱ्याची गुंडागिरी#pune pic.twitter.com/kL4L8xToRr
— News18Lokmat (@News18lokmat) May 1, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.