अनुज गौतम (सागर), 14 एप्रिल : मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यात जवाहरलाल नेहरू पोलिस अकादमीत तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पोलीस अकादमीच्या पीटीएस मैदानावर असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये केली. यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. हवालदाराच्या मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली. दीपकच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कलह असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले जात आहे. याबाबत सर्वच बाजुंनी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.14) दीपकचे पत्नीसोबत भांडण झाले, त्यानंतर त्याने रागातून आपल्या खोलीत जाऊन दरवाजा आतून लावला. यावेळी खोलीत असलेल्या पंख्याला दोरी बांधून फास लावून घेतला. यावेळी पत्नी वैष्णवीला पतीने काहीतरी चुकीचे केल्याचा संशय आला तेव्हा तिने दरवाजातून हाक मारली. परंतु पत्नीच्या हाकेला उत्तर न मिळत असल्याने घाबरलेल्या पत्नीने शेजाऱ्यांना माहिती दिली.
यावेळी काहींनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्याने फास लावून घेतल्याचे दिसून आले. यानंतर तातडीने दरवाजा तोडून त्याला खाली आणण्यात आले. मात्र तोपर्यंत दीपकचा मृत्यू झाला होता. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली.
दीपक आणि वैष्णवी दोघेही पोलीस दलात काम करतात त्यांनी नोकरीदरम्यान एकमेकांना भेट झाली. यानंतर एकमेकांना जोडीदार बनवण्याचा निर्णय घेतला. सुमारे 5 वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले, मात्र मूल होत नसल्याने त्यांच्यात भांडणे सुरू झाली.
गडकरींच्या धमकीमागं आरएसएस कनेक्शन; पुजारीच्या दाव्यानं खळबळ
यादरम्यान मृत हवालदार दीपक पटेरिया हा अंमली पदार्थांचे सेवण करत होता. या प्रकरणी माहिती देताना गोपालगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी राकेश शर्मा म्हणाले की, शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.