डॉ. खानखोजे यांच्या मनात भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात भारतासाठी कृषिक्षेत्रातच कार्य करण्याचा विचार पक्का झाला व त्यांनी तो प्रत्यक्षात आणला व जगाच्या पाठीवर भारताचे नांव त्यांच्यामुळे कोरले गेले. आज त्यांची पुण्यतिथी. त्यांच्या महान कार्याचा आढावा घेतलाच पाहीजे.
नागपुरामध्ये संत्रे बागाईतदार या सहकारी संस्थेने त्यांना सल्लागार म्हणून घेतलं. पण शासकीय लालफितीमुळे त्यांचा संत्रा संशोधन प्रकल्प बारगळला. पुन: निराशा पदरी आली. केंद्र सरकारने त्यांना आकाशवाणीवरून शेती मंडळीसाठी दरमहा व्याख्यानं देण्यासाठी कामगिरी दिली. अशी त्यांनी ऐंशी व्याख्यानं दिली. ‘ग्रामहित’ या नागपूरच्या शासकीय मासिकात आणि इतर अनेक वृत्तपत्रांतून कृषिलेख लिहिले. मात्र त्यांनी व्याख्यानांतून व लेखांतून मांडलेल्या विचारांकडे बहुतांशी दुर्लक्षच झालं. त्यांनी क्रांतिकारक जीवनासाठी सैनिकी शिक्षणही घेण्याचा वारंवार प्रयत्न केला. असे असूनही जीवनप्रवासात त्यांची कृषी विषयक ज्ञानलालसाही सतत जागृत होती. मात्र त्यांच्या देशभक्तीच्या अतीव ओढीमुळे त्यांच्या कृषितज्ज्ञ व्यक्तिमत्त्वाची बाजू काहीशी अज्ञातच राहिली आहे. तरीही कृषिक्षेत्रातील त्याच्या उपलब्ध योगदानाची जास्तीत जास्त नोंद घेतली गेली आहे. ते प्रखर क्रांतिकारक की बुद्धिमान कृषिशास्त्रज्ञ असा प्रश्न जरूर पडतो. खरं पाहिलं तर दोन्ही ओळखी योग्यच ठरतात. मात्र त्यांच्या देशभक्तीच्या अतीव ओढीमुळे त्यांच्या कृषितज्ज्ञ व्यक्तिमत्त्वाची बाजू काहीशी अज्ञातच राहिली आहे. कृषितज्ज्ञ म्हणून त्यांचं चित्र रेखाटताना त्याला पूर्णत्व देता येत नाही, कारण एक तर त्यांनी स्वत:विषयी लिखित स्वरूपात ठेवलेलं फारसं काही हाती लागत नाही. त्यांच्या काही चरित्रलेखकांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांनीसुद्धा ती खंत नोंदवून ठेवली आहे. पांडुरंग खानखोजे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८४ रोजी वर्धा येथील पालकवाडी या ठिकाणी झाला. त्यांचे वडील सदाशिव व्यंकटेश खानखोजे यांचा व्यवसाय न्यायखात्यातील अर्ज लिहिण्याचा होता. पैसे घेऊन दुसर्यांचे अर्ज लिहिण्याच्या कामासाठीसुद्धा तत्कालीन सरकारी प्रमाणपत्राची आवश्यकता असे, म्हणून कायद्याचा अभ्यास मराठीतून करावा लागे व परीक्षा द्यावी लागे. त्यांचे आजोबाही १८५७ च्या सशस्त्र क्रांतीमध्ये सामील झाले होते. हीच त्यांच्या क्रांतिकारक आयुष्याची पायाभरणी असावी. त्यांचे वडील कटोलहून पालकवाडी (वर्धा) येथे स्थलांतरित झाले. तिथेच प्राथमिक मराठी शिक्षण झालं. त्यानंतरचं माध्यमिक शाळेतलं इंग्रजी चौथ्या वर्षाचं शिक्षण पूर्ण करून नागपूरला नील सिटी हायस्कूलमध्ये दाखल झाले. त्यांच्या माध्यमिक शाळेतील शिक्षणाबरोबरच देशभक्तीचे धडे गिरवले. मोठे झाल्यावर ‘बांधव समाज’ या देशभक्तांच्या संघटनेने लोकजागृतीसाठी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यापैकीच एक म्हणजे दुष्काळात त्यांनी शेतकर्यांचे मेळावे घेतले. क्रांतीसाठी सैनिकी शिक्षणाप्रमाणेच आपण शेतीशास्त्रही शिकलं पाहिजे असा महत्त्वाचा विचार त्यांच्या मनावर कायमचा ठसला. लोकमान्य टिळक आणि देशातील इतर जहाल क्रांतिकारक, त्याचप्रमाणे जगभर विखुरलेले क्रांतिकारक यांच्याशी त्यांचा सतत संबंध आला आणि क्रांतिकारक जीवनासाठी सैनिकी शिक्षणही घेण्याचा त्यांनी वारंवार प्रयत्न केला. जगभरच्या भटकंतीमुळे अनेक लोकांशी त्यांचा परिचय झाला. अनेक भाषांची ओळख झाली. अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या आरेगॉन येथील अॅग्रिकल्चरल कॉलेजातून त्यांनी कृषिशास्त्राची बी.एस्सी. ही पदवी मिळवली. त्या वेळी ते पंचवीस वर्षांचे होते. या पदवीमुळे त्यांना वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात नोकरी मिळाली. तेथूनच त्यांनी पुढची एम.एस्सी. ही पदवी मिळवली. त्या वेळी त्यांनी शेतावर काम करून आपली आर्थिक गरज भागवली. हा पदवी अभ्यास करताना सुप्रसिद्ध कृषिशास्त्रज्ञ, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्याशी त्यांचा खूप जवळून संबंध आला. त्यामुळे शेतकरी समाजाला उपयुक्त अशा कृषिकार्याचं महत्त्व त्यांच्या मनावर ठसलं. म्हणून पुढचं शेतीविषयक शिक्षण त्यांनी चालूच ठेवलं. मिनेसोटा विद्यापीठातून त्यांना डॉक्टरेट ही सर्वोच्च पदवी मिळाली. या पीएच.डी. पदवीसाठी त्यांनी गव्हावर सखोल संशोधन केलं होतं. त्यांच्या अध्यापनाचा लौकिक वाढला. जमीन आणि पिकं, अनुवंशशास्त्र हे त्यांचे हातोटीचे विषय. कृषिक्षेत्रात त्यांचा लौकिक दूरवर अमेरिकेतल्या भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. त्यांच्या ‘हिंदुस्थानी स्टुडंट्स’ या मासिकात त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. मासिकाचे संपादक होते ना. भि. परुळेकर, एन. जे. भोळे, गुर्जर वगैरे. त्यात त्यांनी भारताला डॉ. खानखोजे यांच्या कामगिरीची आवश्यकता आहे असं लिहिलं होतं. अध्यापनाबरोबरच त्यांनी गव्हावरचं आपलं संशोधनही चालू ठेवलं. गव्हाचं सुधारित वाण तयार करण्यावर त्यांचा भर होता. त्यामध्ये पावसाळी व उन्हाळी अधिक उत्पादक वाण, तांबेर्याला प्रतिबंध करणारं वाण, बर्फाळ प्रदेशातही टिकून राहणारं कणखर वाण, कोरडवाहू जमिनीत टिकणारं वाण, उंच डोंगरातल्या शेतात पिकू शकणारं वाण अशा विविध गुणधर्माची वाणं त्यांनी संशोधित केली. या यशस्वी संशोधनामुळे त्यांना २९२९ च्या कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या राष्ट्रीय प्रदर्शनात एक हजार मेक्सिकन पेसो रकमेचा पहिला पुरस्कार आणि राष्ट्रीय सन्मान पदविका देण्यात आली. या यशस्वी कार्याची दखल घेऊन मेक्सिकोच्या सरकारने एक कृषिसुधारप्रकल्प त्यांच्याकडे सोपवला. आधुनिक शास्त्रीय कृषितंत्र सहकारी तत्त्वावर उपयोगात आणण्यासाठी कृषी अधिकारी व शेतकरी यांना याविषयी प्रशिक्षित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. त्यांनी सामान्य शेतकरी, इतर अल्पभूधारक आणि शेतमजूर यांच्या भेटीतून त्यांची पारंपरिक शेतीपद्धती आणि समस्या जाणून घेतल्या. सहकारी तत्त्व व आधुनिक तंत्र याविषयी त्यांचं प्रबोधन केलं. अनेक स्थानिक कृषिवलसंघ निर्माण केले व एका मध्यवर्ती महासंघाशी त्यांची बांधणी केली. त्यांनी मका सुधार प्रकल्पावर आपलं लक्ष केंद्रित केलं. स्वत:च्या प्रयोगशाळेत आणि शेतकर्यांच्या शेतात प्रयोग केले. केवळ मक्याचं उत्पादन वाढवून न थांबता त्यांनी मक्याची कणसं अधिक ताजी व आकर्षक दिसतील व बाजारात दीर्घकाळ टिकून राहतील या दृष्टीने पॅकिंग आणि इतर उचित तंत्रज्ञान यावर संशोधन केलं. सतत बर्फवृष्टी होणार्या कडक थंडीतसुद्धा अमेरिकन लोकांना हिरवीगार ताजी कणसं खाण्यासाठी भरपूर प्रमाणात मिळू लागली. शेवटी मेक्सिकोच्या शेतकर्यांना त्याचा फायदा मिळू लागला. गहू आणि मक्याच्या पाठोपाठ डॉक्टरांनी तूर आणि चवळी या पिकांकडे आपलं संशोधन वळवलं. त्याचप्रमाणे सोयाबीन व वाल यावरही त्यांनी प्रयोग केले. आजवर माहीत नसलेलं ‘सोयाबीन’ हे पीक स्थानिक शेतकर्यांना माहीत करून दिलं. त्याची लोकप्रियता वाढवली. सोयाप्रमाणेच शेवगा या पिकाची वैविध्यपूर्ण उपयुक्तता शेतकर्यांना व नागरिकांना दाखवून दिली. पाला, शेंगा, बिया, बियांचं सुगंधी तेल अशा विविध गुणांचा परिचय त्यातून झाला. रताळी आणि सोनताग यांची फायदेशीर शेती कशी करता येईल यावर संशोधन करून ते शेतकर्यांपर्यंत पोहोचवलं. १९२९ साली डॉ. खानखोजे यांच्या भारतीय शेतकर्यांसाठी काम करण्याच्या इच्छेचा विचार करून मेक्सिकोच्या सरकारने तेथील उष्ण कटिबंधीय शेतीशाळांना भेट देता यावी म्हणून ब्रिटिश सरकारकडे तशी विचारणा केली. दुर्दैवाने खानखोजे यांचं क्रांतिकार्य आडवं आलं आणि ब्रिटिशांनी त्या अर्जावर नकारात्मक शेरा मारला. मात्र नंतर एक चांगली घटना घडली. डॉक्टरांच्या अध्यक्षतेखाली मेक्सिकन सरकारचं एक कृषिमंडळ १९३१ साली युरोप दौर्यावर धाडण्यात आलं. तेथील फ्रान्स, स्पेन, हॉलंड, जर्मनी इत्यादी देशांमध्ये मेक्सिकोच्या कृषी-अर्थव्यवस्थेवर व्याख्यानं देण्यासाठी व तेथील कृषिसंशोधनाचा अभ्यास करण्यासाठी हे मंडळ ऑगस्ट १९३१ मध्ये गेलं. प्रा. खानखोजे यांनी १९०६ साली प्रथम भारतभूमी सोडली.