मुंबई, 13 मे : आयपीएल 2023 मध्ये 59 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पारपडला. या सामन्यात पंजाब किंग्सचा विस्फोटक फलंदाज प्रभसिमरन सिंह याने दमदार शतक ठोकत संघासाठी 103 धावांची कामगिरी केली. प्रभसिमरन सिंह याने केलेलं शतक आयपीएल 2023 मधील पाचवे शतक ठरले.
दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना पारपडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी फलंदाजीसाठी पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंह आणि शिखर धवन यांची जोडी मैदानात उतरली. परंतु दुसऱ्याच ओव्हरमध्ये संघाचा स्कोर 10 असताना कर्णधार शिखर धवनची विकेट पडली. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या ओव्हरमध्ये ही संघाच्या 2 विकेट पडल्या. तेव्हा संघाचा युवा फलंदाज प्रभसिमरन सिंहने संघाचा डाव सावरला आणि मैदानात चौफेर फटकेबाजी केली.
IPL 2023 LSG vs SRH : विराट कोहलीच्या चाहत्यांनी घेतला लखनऊशी पंगा, स्टेडियममध्ये असं काही केलं की…
प्रभसिमरन सिंहने मैदानावर उभे राहून 65 चेंडूत 103 धावा केलया. पंजाबचे सर्व बहुतांश फलंदाज दिल्लीच्या भेदक गोलंदाजी फ्लॉप ठरत असताना प्रभसिमरन सिंह मात्र संघासाठी एकटा लढला, त्याच्याच जोरावर पंजाबला 20 ओव्हरमध्ये 167 धावा करता आल्या. प्रभसिमरनने ठोकलेले शतक त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले तर आयपीएल 2023 मधील पाचवे शतक ठरले. यापूर्वी सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, यशस्वी जैस्वाल, हॅरी ब्रुक यांनी आयपीएल 2023 मध्ये शतकीय कामगिरी केली आहे.
कोण आहे प्रभसिमरन सिंह ?
प्रभसिमरन सिंगने वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याने पंजाब विविध वयोगटात बऱ्याच धावा केल्या, परंतु भारताच्या अंडर-19 संघात जाण्यासाठी बराच काळ थांबावे लागले. त्याने पंजाब अंडर-23 जिल्हा स्पर्धेत एकाच डावात 298 धावा केल्या आणि निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर अंडर-19 आशिया चषक स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड झाली. प्रभसिमरन सिंगच्या T20 कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत 41 डावांमध्ये 37 च्या सरासरीने 1179 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 145 च्या जवळपास राहिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.