तिरुवनंतपुरम 22 मे : प्रवास म्हटलं की अनेकजण ट्रेनचा पर्याय निवडतात. सुरक्षित आणि बजेटमध्ये आरामदायी प्रवास करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, तुम्ही स्टेशनवर ट्रेनची वाट पाहात थांबला असाल आणि ट्रेन न थांबता तुमच्यासमोरून निघून गेली तर? अशीच एक घटना नुकतीच समोर आली आहे. केरळमध्ये अशीच एक घटना घडली.
ट्रेन सुटली तरी डोंट वरी, तिकिटाचे पैसे परत करेल रेल्वे; रिफंड मिळवण्याची सोपी प्रोसेस
केरळमधील शोरानूरला जाणारी ट्रेन ज्या स्थानकावर थांबायला हवी होती तिथे थांबली नाही. मात्र काही मिनिटांनी एक किलोमीटर रिव्हर्स घेत ड्रायव्हरने प्रवाशांच्या निराशेचं संतापात रुपांतर होण्यापासून रोखलं. सोमवारी सकाळी पाऊणे आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात तिरुअनंतपुरमहून निघालेली 16302 वायनाड एक्सप्रेस ‘डी ग्रेड स्टेशन’ चेरियानाड येथे वाट पाहणाऱ्या प्रवाशांसमोरून न थांबताच निघून गेली.
टाइम्स ऑफ इंडियाने रेल्वे अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटलं आहे की, चेरियानाड स्टेशन हे हॉल्ट स्टेशन आहे, त्यामुळे इथे सिग्नल नाही. लोको पायलटकडूनही काही चूका होऊ शकतात, ट्रेन काही मीटर पुढे गेल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात आली. अधिकाऱ्याने सांगितलं की, या घटनेमुळे नियोजित वेळापत्रकात आठ मिनिटे उशीर झाला पण नंतर चालकांनी त्याची भरपाई केली. वायनाज एक्स्प्रेस पुढे निघून गेली होती, त्यानंतर ती 700 मीटर मागे आली.
रेल्वेच्या सूत्रांचा हवाला देत वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, रिव्हर्स आल्यानंतर कोणत्याही प्रवाशाची गैरसोय झाली नाही. लोक आरामात खाली उतरत होते आणि ट्रेनमध्ये चढतही होते. मात्र तरीही नियमानुसार लोको पायलटकडून या घटनेसाठी स्पष्टीकरण मागवलं जाईल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.