नवी दिल्ली, 28 एप्रिल : जंगल म्हटलं की खतरनाक प्राणी, शिकार… असेच भयंकर, थरारक व्हिडीओ आजवर तुम्ही पाहत आला आहात. वाघ, सिंह, बिबट्या असे शिकार करणारे प्राणी आणि त्यांच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी पळणारे छोटे छोटे प्राणी. नेहमी शिकारीच्या मूडमध्ये असणारे हे प्राणी त्यांच्या अंगातही कीडे कमी नसतात बरं का? जंगलातील प्राणीही मजामस्ती करतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.
जंगलातील खतरनाक प्राणीही मजामस्ती करतात, असं सांगितलं तर साहजिकच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण प्राण्यांच्या मजामस्तीचा हा व्हिडीओ समोर आला आहे. जंगलात असं दृश्य कदाचित आजवर तुम्ही कधीच पाहिलं नसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसला नाही तर सांगा.
व्हिडीओत पाहू शकता एक चित्त्या दिसतो आहे. ज्याने शिकार केली आहे आणि आपली शिकार तो खातो आहे. इतक्यात मागून एक प्राणी येतो. तो त्या चित्त्याची शेपटी आपल्या तोंडात धरून खेचतो आणि पळतो. पण चित्ता खाण्यात व्यस्तच आहे. म्हणून तो प्राणी पुन्हा येतो आणि चित्त्याची शेपटी खेचतो, तरी चित्ता काहीच प्रतिक्रिया देत नाही.
OMG! स्पर्श होताच गायब झाला हा विचित्र जीव; VIDEO पाहून सांगा तो कोण?
त्या प्राण्याची हिंमत वाढते आणि तो पुन्हा पुन्हा चित्त्याची शेपटी खेचतो आणि पळतो. चित्ताही बघून बघून घेतो आणि शेवटी तो चवताळतो. त्या प्राण्याची पाठ धरतो. प्राणी पुढे आणि चित्त्या त्याच्या मागे पळतो. एका झाडाभोवती तो चित्त्याला गरागरा फिरवतो पण चित्त्याच्या तावडीत काही सापडत नाही.
आणखी एका दृश्यात चित्ता एका ठिकाणी उभा दिसतो आहे. तेव्हा हा प्राणी हळूच त्याच्या मागे जाऊन त्याची शेपटी खेचतो. चित्त्ता त्याच्या मागे लागतो आणि पुन्हा त्यांचा पकडापकडीचा खेळ सुरू होतो.
खतरनाक वाघाला कुत्र्यासारखं हाकलण्याचा प्रयत्न; हडहड केलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO
झारखंडचे उपजिल्हाधिकारी संजय कुमार यांनी आपल्या @dc_sanjay_jas ट्विटर अकाऊंटवर हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘खतरों के खिलाड़ी’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.
खतरों के खिलाड़ी..😅#JustToSmile #SM pic.twitter.com/hkDRHihVnt
— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) April 26, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.