भोपाळ 30 एप्रिल : नोएडातील एका तरुणीने आपल्या रुसलेल्या प्रियकरावर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्योतिषाची मदत घेतली. प्रियकरावर नियंत्रण ठेवण्याच्या नावाखाली ज्योतिषाने तरुणीची 80 हजार रुपयांची फसवणूक केली. ज्योतिषाने मुलीकडून पूजेच्या नावावर हे पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. एवढं सगळं करूनही नियंत्रणात राहणं सोडाच, पण प्रियकर प्रेयसीशी बोललाही नाही. शेवटी आपल्यासोबत झालेली फसवणूक मुलीच्या लक्षात आली. यानंतर तिने ग्वाल्हेर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. तिच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने आता मुलीची फसवणूक करणाऱ्या ज्योतिषाचा शोध सुरू केला आहे.
विशेष म्हणजे नोएडामध्ये राहणारी 24 वर्षीय तरुणी दिल्लीतील सरकारी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. ही मुलगी ग्वाल्हेरच्या एका मुलाच्या प्रेमात पडली. काही दिवसांपूर्वी या तरुणीचं तिच्या प्रियकराशी भांडण झालं होतं. रागाच्या भरात प्रियकराने तिच्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलं. सर्व प्रयत्न करूनही जेव्हा मुलगा तिच्याशी बोलला नाही तेव्हा शेवटी ती त्याची समजूत घालण्यासाठी ग्वाल्हेरला आली.
ग्वाल्हेरला आल्यानंतर ही तरुणी एका हॉटेलमध्ये राहून तिच्या प्रियकराला सतत फोन करत होती. पण प्रियकराने ना कॉल रिसिव्ह केला ना त्याने तिच्या मेसेजला रिप्लाय दिला. नाराज प्रियकर राजी न झाल्याने अखेर या तरुणीने ज्योतिषाची मदत घेतली. तिने ज्योतिषाच्या माध्यमातून प्रियकराची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
मुलीने इंटरनेटवरून या ज्योतिषाचा नंबर मिळवला. त्या व्यक्तीशी संपर्क साधला असता त्याने मुलीला आश्वासन दिलं. पूजेच्या माध्यमातून प्रियकराला आपल्या ताब्यात घेणार असल्याचं त्याने तरुणीला सांगितलं. मुलीला वशिकरणाची पूजा करून देण्याच्या नावाखाली ज्योतिषाने 18 हजार रुपये ऑनलाइन खात्यात जमा करून घेतले.
ज्योतिषाने सांगितलं की वशिकरणच्या पूजेनंतर तिला तिच्या प्रियकराकडून एका नंबरवरून मिस कॉल येईल, परंतु हा कॉल उचलायचा नाही. जर तिने असं केलं तर काही दिवसात प्रियकर तिच्यासाठी वेडा होईल आणि तो तिच्याकडे धावत येईल. दोन दिवसांनंतर मुलीला एका नंबरवरून मिस कॉल आला जो तिच्या प्रियकराच्या नावावर रजिस्टर्ड असल्याचं दिसत होतं. त्यामुळे यावर मुलीचा विश्वास बसला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.