गुलशन सिंग (बक्सर), 16 मे : मागच्या कित्येक वर्षांपासून आपण बिहारविषयी चुकीची माहिती ऐकत आलो आहोत किंवा बिहारमध्ये तशी परिस्थिती असेल. परंतु मागच्या काही काळात बिहारमध्ये मोठे बदल होताना दिसत आहेत. बिहारमध्ये नागरीसुवीधांसह अनेक सामाजीक समस्यांवरही लक्ष दिले जात आहे. दरम्यान बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथून पोलिसांनी विधवा महिलेचे मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिल्याची अनोखी घटना समोर आली आहे. या अनोख्या लग्नाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होत आहे. ब्रह्मपूर पोलीस स्टेशन हद्दीतील रक्षा नगर गावातील विधवा महिलेच्या पतीच्या निधनानंतर मुस्कान आपल्या 2 वर्षाच्या चिमुरडीसह एकटीच जीवन जगत होती.
मात्र, मुस्कानची ओळख ब्रह्मपूर गावातील स्थानिक रहिवासी देवकुमार साह यांचा मुलगा सूरज कुमार साह याच्याशी झाली. गेल्या 6 महिन्यांपासून दोघांमधील प्रेमसंबंध वाढत गेले. घरातील सदस्यांना हे नाते पसंत न पडल्याने दोन्ही प्रेमी युगल घरातून पळून गेले.
जेव्हा मुस्कानचे सूरजसोबतचे प्रेमसंबंध घरच्यांना कळले तेव्हा दोन्ही कुटुंबातील लोकांनी या नात्याबाबत पसंती दिली नाही. यानंतर विधवा महिलेसह तिचा प्रियकर सूरज घरातून पळून झारखंडमधील जमशेदपूर येथे गेला.
या दरम्यान कुटुंबीयांनी दोघेही बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांना ते दोघेही सापडले. त्या प्रेमी युगुलाची चौकशी केली असता दोघांचे एकमेकांवार प्रेम असल्याचे निघाले. यादरम्यान दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याचवेळी ब्रह्मपूर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष बैजनाथ चौधरी यांनी दोघांच्याही कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. यानंतर पोलिसांनी दोन्हीकडील लोकांना लग्नासाठी तयार केले. यानंतर दोघांनी प्रसिद्ध बाबा ब्रह्मेश्वरनाथ मंदिरात लग्न केले.
या विवाहात स्थानिक पोलीस, लोकप्रतिनिधी आणि मंदिर समितीच्या लोकांनी वऱ्हाडी होऊन सर्व विधी पार पाडला. यानंतर भगवान भोलेनाथांना साक्षी मानून बाबा ब्रह्मेश्वर नाथ मंदिरात त्यांचा विवाह लावण्यात आला. या कामगिरीने पोलिसांचेही कौतुक केले जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.