पुणे, 27 मार्च : पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. गेल्या काही दिवसात कोयता गँगने देखील शहरात दहशत माजवली होती. या घटना कमी होत असतानाच आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील अल्पवयीन मुलीचा 50 हजार रुपयांसाठी मध्य प्रदेशमध्ये सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 14 वर्षीय मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. दरम्यान या अल्पवयीन मुलीला पुण्यातून पळवून नेऊन विकणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीची पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश मध्ये जाऊन सुटका केली आहे. शांती उर्फ सांतो हरनाम कुशवाह (40) आणि धर्मेंद्र यादव (22) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीची मोठी बहीण पुण्यातील एका वर्कशॉपमध्ये काम करत होती. त्यावेळी या तरुणीची ओळख शांतीशी झाली. शांतीने या तरुणीला तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न लावून देते असे खोटे आश्वासन देऊन तिला मध्य प्रदेशात नेले.
तुमच्या शहरातून (पुणे)
वाचा – धक्कादायक! मंदिराच्या दारातच रशियन मुलीसोबत नको ते कृत्य केलं अन्…
मध्य प्रदेशात शांतीने या तरुणीचे जबरदस्तीने अवघ्या 50 हजार रुपयांसाठी धर्मेंद्र यादव या अरोपिशी लग्न लावून दिले. दरम्यान, यादवने शांतीला लग्न करण्यासाठी एक मुलगी शोध आणि पैसे घे असे सांगितल्याने हा सगळा प्रकार शांतीने केला. पोलिसांनी या तरुणीचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश गाठले आणि आरोपींना अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.