कोटा, 18 एप्रिल : बेरोजगारीने त्रस्त असलेले तरुण खाण्यापिण्याचे स्टॉल्स उघडून व्यवसाय करत आहेत. तसेच त्या व्यवसायाला आकर्षक नाव देऊन वैयक्तिक आयुष्यातील किस्सेही समोर आणत आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने ‘बेवफा चायवाला’ या नावाने चहाचे दुकान सुरू केले आहे. उत्तर प्रदेशातील या तरुणाने राजस्थानच्या कोटा कोचिंग सिटीमध्ये चहाचे दुकान सुरू केले आहे. हे दुकान सध्या चांगलेच चर्चेत आहे.
शिवम असे या तरुणाचे नाव आहे. त्याने सांगितले की, काही वर्षांपूर्वी त्याच्या प्रेयसीचे लग्न झाले आणि व्यवसायातही तोटा झाला. यासोबतच त्याच्या चुलत भावालाही प्रेमात धोका मिळाला. यानंतर दोन्ही भावांनी कोटा येथे व्यवसाय सुरू केला. तसेच या दुकानाचे ‘बेवफा चाय’ ठेवले. हा चहा 24 प्रकारच्या मसाल्यांनी तयार केला जातो. तसेच हा बेवफा चहा ₹ 10 ते ₹ 500 पर्यंत उपलब्ध आहे. याठिकाणी कोचिंगला येणाऱ्या विद्यार्थ्यांची या चहाला पहिली पसंती मिळत आहे.
चहा-कॉफीचे नाव फारच मनोरंजक –
शिवमने सांगितले की, विद्यार्थी म्हणतात की, ‘सिर दर्द फ्री वाली चाय पिलाओ या फिर ‘सुकून वाली चाय’, जी औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी बनवली जाते, तसेच ज्यामुळे तुम्हाला आराम वाटतो. त्याच्या दुकानात सकाळपासून संध्याकाळपर्यंत 125 किलो पासून 150 किलो दूध वापरले जाते. ‘बेवफा चाय’चे वेड असलेले विद्यार्थी आणि अनेक लोकांव्यतिरिक्त कोचिंग फॅकल्टी आणि कर्मचारीही आहेत.
बेवफा चहाच्या दुकानातील बॅनर इथल्या ग्राहकांना आकर्षित करतात, ज्यावर लिहिलेले होते “चहाचे विविध प्रकार – सिरदर्द फ्री चाय, सुकून वाली चाय, थकान फ्री वाली चाय, डिप्रेशन फ्री वाली चाय, करंट वाली चाय, बेवफा के आंसू वाली चाय, बेवफा के दर्द वाली चाय, दिलखुश चाय, दोस्ती वाली चाय, यादों वाली…आणि बदनाम कॉफी आणि वफा वाली लस्सीही इथे खूप प्रसिद्ध आहेत. यालाही खूप मागणी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.