संतोष कुमार गुप्ता (छपरा), 19 एप्रिल : बिहारमध्ये एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. तरूणीवर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रियकराला आपला जीव गमवावा लागला आहे. प्रेयसीच्या कुटुंबीयांनी फसवणूक करून तरुणाला आपल्या घरी बोलावून त्याची हत्या केली. यानंतर हा अपघात असल्याचे दाखवण्यासाठी तरूणाचा मृतदेह थेट रेल्वे रुळावर फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. अनोळखी मृतदेह आढळून आल्यावर लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
यानंतर मृत तरुणाची ओळख पटली याचबरोबर तपासात प्रेमप्रकरणावरून हा खून झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे पोलिसांनी रुळावरून अज्ञात तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. सरकारी रेल्वे पोलिसांनी तपासादरम्यान मृतदेहाची ओळख पटवली आहे. हा मृतदेह बौनागंज जलालपूर गावातील रहिवासी देवनाथ यादव या 20 वर्षीय विवेक कुमार या तरूणाचा आहे.
प्रेयसीचं लग्न झाल्यानंतर चोरून घरी भेटायला गेला अन् खोलीत असताना…
रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेने विवेक कुमारचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. शासकीय रेल्वे पोलिसांनी शवविच्छेदन करून विवेक कुमारचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. या मृत्यूमागे वेगळीच चर्चा रंगली जात आहे. विवेकचे वडील देवनाथ राय म्हणाले की, विवेकचे गयासपूर गावातील एका मुलीवर प्रेम होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले. दरम्यान, याबाबत मुलीच्या घरच्यांना माहिती मिळाल्याने ते याच्यावर चिडून होते. यापूर्वीही एकदा मुलीच्या लोकांनी फसवणूक करून विवेकला गयासपूर गावात बोलावले होते. तिथे त्याला पकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. याबाबत विवेकच्या नातेवाईकांनाही माहिती मिळाली होती, मात्र नंतर मुलीच्या कुटुंबीयांनी विवेकला इशारा देऊन सोडून दिले होते.
विवेकचे वडील देवनाथ राय यांनी सांगितले की, यावेळी मुलगा घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांत विवेकचा मोबाइल फोन बंद झाला. काही वेळाने विवेकचा मृतदेह रेल्वे रुळावर पडल्याचे समजले. त्यानंतर नातेवाईकांनी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली.
प्रसारमाध्यमांद्वारे नातेवाइकांकडून प्रेमप्रकरणाबाबत चर्चा होत आहे. मात्र, अद्याप लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करतील अशी माहिती पोलिसांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.