विका पांडे (डेहराडून), 19 एप्रिल : प्रेम आंधळं असतं आणि प्रेमात माणूस काहीही करू शकतो असं आपण बऱ्याच वेळा ऐकत आलो आहे. प्रेमात कधी धोका मिळाला तर माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो याचा काहीच नेम नाही. दरम्यान असेच एक प्रकरण उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमधून `समोर आले आहे.
प्रेयसीने लग्न केल्याने प्रियकर थेट मुलीच्या घरी प्रेयसीला भेटायला गेला. यावेळी प्रेयसीने सोबत येण्यास नकार दिल्याने तिच्याच घरात थेट गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
स्वत:चा जीव धोक्यात घालून सहकाऱ्यांना वाचवलं, वाशिमच्या जवानाला वीरमरण
डेहराडूनच्या प्रेमनगर भागातील ही घटना आहे. प्रियकर आणि प्रेयसीचे घर जवळच होते. परंतु मागच्या दोन महिन्यांपासून प्रेयसी आपल्या सोबत बोलत नसल्याने नाराज प्रियकर तिच्या घरी कोण नसल्याचा फायदा घेत तिला भेटायला गेला. यावेळी त्यांच्या एक तास चर्चा झाली. लग्न झालेली प्रेयसी पुन्हा त्याच्यासोबत यावी असा प्रियकराचा आग्रह होता. प्रेयसीने ते मान्य न केल्याने प्रियकराने थेट तिच्या घरीच आत्महत्या केली.
सोमवारी सकाळी ही महिला घरात एकटीच होती. संधी साधून शाहनवाज तिच्या घरात घुसला, तिथे दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. शाहनवाजने तिच्यावर पुन्हा प्रेमसंबंध सुरू करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली, परंतु महिलेने ते मान्य केले नाही.
त्यानंतर शाहनवाजने महिलेला धमकी दिली की मी तिला तिच्यासमोर आत्महत्या करेन परंतु त्या महिलेने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. काही वेळाने शाहनवाज हा महिलेच्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत गेला. तेथे त्याने केबलची वायर घेत पंख्याला बांधून आत्महत्या केली.
शाळेतून परतणाऱ्या 11 वर्षीय मुलीला कॅब चालकाने दिली लिफ्ट, नंतर केलं भयंकर कृत्य
या घटनेत प्रेयसीने त्याला वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु महिलेला काहीच यश आले नाही. मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शाहनवाज हा रोजंदारी करत होता. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.