हैदराबाद, 13 मे : आयपीएल 2023 मध्ये 58 वा सामना लखनऊ सुपर जाएंट्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात पारपडला. या सामन्यात लखनऊने हैदराबादचा पराभव केला आहे. लखनऊ सुपर जाएंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने विजय मिळवला असून आयपीएल 2023 मधील 6 वा सामना जिंकला आहे.
सनरायजर्स हैदराबादचे होम ग्राउंड असलेल्या राजीव गांधी स्टेडियमवर लखनऊ विरुद्ध हैदराबाद यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी हैदराबादकडून अनमोल प्रीत सिंहने 36, राहुल त्रिपाठीने 20, मार्क्रमने 28, हेन्रीचं क्लासेनने 47, अब्दुल समदने 37 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादने लाखनऊ समोर 20 ओव्हरमध्ये 183 धावांचे आव्हान ठेवले. तर लखनऊने या दरम्यान हैदराबादच्या ६ विकेट्स घेतल्या.
लखनऊ सुपर जाएंट्सकडून विजयाचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात कायल मेयर्स आणि क्विंटन डी कॉक यांची जोडी उतरली. परंतु अवघ्या 2 धावा करून कायल मेयर्स बाद झाला. त्यानंतर लखनऊकडून क्विंटन डी कॉकने 29, प्रेरक मांकडने 64, मार्कस स्टोनीसने 40, निकोलस पुरनने 44 धावांची खेळी कलेची. अखेरच्या काही ओव्हरमध्ये निकलोस पुरन आणि प्रेरक मांकडच्या तुफान फटकेबाजीमुळे सामना लखनऊच्या बाजूने झुकला. अखेर लखनऊ सुपर जाएंट्सने 4 चेंडू आणि 7 विकेट्स राखून हैदराबादवर विजय मिळवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.