मुंबई, 15 एप्रिल: तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करताय का? असं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी त्याची कागदपत्र तपासून घेणं खूप गरजेचं असतं. आज आम्ही तुम्हाला फ्लॅट, फ्लोर, घर किंवा जमीन खरेदी करताना ग्राहकांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी जाणून घेणार आहोत. कोणताही गोष्ट करण्यापूर्वी अनेक गोष्टींची माहिती घेणे आवश्यक असते. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. नवीन प्रॉपर्टी खरेदी करताना तुम्ही ज्या लोकेशन, विविध कागदपत्रे, विक्रेत्याचे डिटेल्स, मालमत्तेवरील कोणत्याही प्रकारचा वाद आदी कामांचा समावेश असतो. यासाठी तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊ शकता.
डॉक्यमेंट तपासताना तुम्ही ते लक्षपूर्वी तपासायला हवेत. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये फ्लॅट किंवा बंगला खरेदी करत आहेत. ते रेरामध्ये रजिस्टर असायला हवे. हा भारतीय संसदेने संमत केलेला रिअल इस्टेट कायदा आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील सामान्य जनतेच्या हिताचे रक्षण करणे आणि फसवणुकीपासून त्यांचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे.
ओनरशिप व्हेरिफिकेशन
प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी विक्रेत्याच्या टायटल आणि ओनरशिपचं व्हेरिफिकेशन करणं खूप गरजेचं असतं.
चॅनल डॉक्यूमेंट्स
चॅनल डॉक्यूमेंट्स चेक करणंही गरजेचं आहे. चॅनल डॉक्यूमेंट म्हणजेच X ने Y ला विकली, Y ने Z ला विकली. या दरम्यान जी डील झाली त्यात सर्वांचे मत तयार होते. म्हणजेच ते कोणाला कुठून मिळाले, या सर्वांचा हवाला असायला हवा.
Loan Recovery: लोन वसुलीसाठी रिकव्हरी एजेंट देऊ शकत नाही धमकी, काय आहेत तुमचे अधिकार?
एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट
या सर्टिफिकेटवरुन तुम्हाला कळतं की, तुम्ही खरेदी करत असलेल्या मालमत्तेवर कोणतेही मोर्टगेज, बँक लोन किंवा कोणताही टॅक्स थकलेला नाही. याशिवाय कोणताही दंड नाही, त्याची माहिती मिळते. याशिवाय तुम्ही रजिस्ट्रार कार्यालयात जाऊन फॉर्म क्रमांक 22 भरून माहिती गोळा करू शकता.
ऑक्यूपॅन्सि सर्टिफिकेट
ऑक्यूपॅन्सि सर्टिफिकेट हे एक महत्त्वाचे डॉक्यूमेंट आहे. जे बिल्डरकडून घेतले जाणे आवश्यक आहे. तो न दिल्यास डेव्हलपरच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार खरेदीदारांना आहे.
Home Loan घेण्याचा विचार करताय? मग SBI बँक आहे बेस्ट, मिळताय ‘या’ सुविधा
पजेशन लेटर
डेव्हलपर खरेदीदाराच्या नावे पजेशन लेटर जारी करतो. ज्यामध्ये प्रॉपर्टीवर ताबा मिळण्याच्या तारखेचा उल्लेख असतो. होम लोन मिळवण्यासाठी या कागदपत्राची मूळ कॉपी सादर करणे आवश्यक आहे. ओसी मिळाल्याशिवाय, केवळ ताबा पत्र मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी पुरेसे मानले जाऊ शकत नाही.
गहाण ठेवलेली प्रॉपर्टी आहे का?
मॉर्गेज हा गहाण ठेवणे हे एक प्रकारचे कर्ज आहे. ज्याचा वापर कर्जदार घर किंवा घराची खरेदी किंवा देखरेख करण्यासाठी किंवा रियल एस्टेटच्या इतर रुपांमध्ये करतो. तसेच कालांतराने ते भरण्यास सहमती दर्शवतो. प्रॉपर्टी, लोन सिक्योर करण्यात कोलेटरलच्या रुपात काम करते. हे एकदा तपासावे.
टॅक्स पेमेंटचं स्टेटस चेक करा
प्रॉपर्टी टॅक्स न भसल्याने संपत्तीवर चार्ज लागतो. ज्यामुळे त्याच्या मार्केट व्हॅल्यूवरही परिणाम होतो. त्यामुळे विक्रेत्याने मालमत्ता करात काही चूक केली आहे की नाही हे तपासण्यासाठी खरेदीदाराने स्थानिक पालिका प्राधिकरणाला भेट दिली पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.