नवी दिल्ली, 07 मे : चोरीचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो असतात. चोर किती हुशारीने चोरी करतात हे बऱ्याच व्हिडीओत तुम्ही पाहिले असतील. अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अवघ्या 50 सेकंदात चोराने असं काही केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाल आहे. फक्त 50 सेकंदाचाच हा व्हिडीओ आहे.
एका बिल्डिंगमध्ये एक चोर चोरी करायला गेला. चार मजली ही इमारत बिल्डिंगच्या पाइपवरून तो बिल्डिंगवर चढला. समोरच्या बिल्डिंगमधील व्यक्तीने त्याला पाहिलं आणि आपल्या कॅमेऱ्यात शूट केलं. ज्यात त्याचा हा प्रताप कैद झालं.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एका बिल्डिंगच्या पाइपवर एक व्यक्ती चढताना दिसते आहे. ती त्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन बसते. तेव्हा ही व्यक्ती बघते आणि मोठ्याने ओरडते. कोण आहेस, काय करायला आला आहे, असं विचारते. तसा तो तरुण घाबरतो आणि बिल्डिंगवरून पुन्हा खाली उतरतो. त्याला सूट करणारी व्यक्ती त्याला पकडा पकडा असं ओरडतेही. खाली उतरल्यानंतर ही व्यक्ती फरार झाली.
स्कूटी चोरायला आले अन् भयंकर घडलं, स्वतःचीच गाडी सोडून पळाले चोर; पाहा VIDEO
@gharkekalesh ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील ही घटना आहे.
Verbal kalesh over thief climbing and Descending 4floor under 50seconds in West Delhi pic.twitter.com/0nLbDhRJwM
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) May 7, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.