जन्माला आलेल्या प्रत्येक जिवाचा मृत्यू अटळ आहे. प्रत्येक सजीवाला ठरावीक कालावधीनंतर मृत्यूचा सामना करावा लागतो. एकीकडे ही सत्य स्थिती असताना दुसरीकडे संशोधक माणूस अमर कसा होऊ शकतो, यावर गेल्या कित्येक वर्षांपासून संशोधन करत आहेत. याबाबत आतापर्यंत अनेक वेळा भाष्यदेखील करण्यात आलं आहे. परंतु, माणसाच्या अमरत्वाबाबत ठोस गोष्टी समोर आलेल्या नाहीत.
या पार्श्वभूमीवर एका संशोधकाने आश्चर्यकारक दावा केला आहे. माणूस लवकरच अमर होऊ शकतो, असं या शास्त्रज्ञानं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या शास्त्रज्ञानं यापूर्वी वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने अचूक भविष्य वर्तवलं आहे. ही गोष्ट लक्षात घेता त्याची माणसाच्या अमरत्वाबाबतची भविष्यवाणी खरी ठरणार की खोटी हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पृथ्वीवर वावरणारा माणूस अमरत्व मिळवू शकतो का हा प्रश्न शतकानुशतकं जुना आहे; पण या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणीही शोधू शकलेलं नाही. पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाचा/माणसाचा कधी ना कधी मृत्यू होतो; पण माणूस लवकरच अमर होऊ शकतो, असा आश्चर्यकारक दावा नुकताच एका संशोधकानं केला आहे. रे कुर्जवील असं या संशोधकाचं नाव असून, तो एक भविष्यवेत्ता आणि कम्प्युटर शास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो.
`माणूस 2031 पर्यंत अमर होईल. अवघ्या आठ वर्षांनी जगात ही मोठी क्रांती होऊ शकते,` असा दावा कुर्जवील यांनी केला आहे. `आपण अशा काळातून जात आहोत जिथं तांत्रिक बदल मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या बदलांचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. येत्या काळात हे तांत्रिक बदल आपलं जीवन बदलून टाकतील अशी शक्यता आहे,` असे कुर्जवील यांनी म्हटलं आहे.
रे कुर्जवील यांची ही भविष्यवाणी गांभीर्यानं घेतली जात आहे. कारण यापूर्वी त्यांनी जितके अंदाज व्यक्त केले होते, ते सर्व खरे ठरले आहेत. नव्या शतकात जग कम्प्युटरचा गुलाम होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी 1990मध्ये केली होती. ही भविष्यवाणी खरी ठरली. `पुढच्या काही वर्षांत कम्प्युटरची शक्ती इतकी प्रचंड असेल की अमरत्व आपल्या आवाक्यात येईल,` असं आता कुर्जवील यांनी सांगितलं आहे. `2029पर्यंत जगभरात माणूस तंत्रज्ञानाच्या जोरावर चमत्कार करील. माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अमरत्व प्राप्त करील,` असं कुर्जवील यांनी सांगितलं आहे.
माणसाच्या अमरत्वाविषयी दावा करणारे रे कुर्जवील हे एक भविष्यवेत्ते आणि कम्प्युटर शास्त्रज्ञ म्हणून जगात प्रसिद्ध आहेत. त्यांनी वर्तवलेलं भविष्य खरं होतं, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. कुर्जवील यांच्या मते, माणूस कृत्रिम बुद्धिमत्तेवर प्रभुत्व मिळवण्याच्या मार्गावर आहे. जेव्हा ही गोष्ट पूर्णपणे साध्य होईल, तेव्हा लोकांना आपल्या भौतिक उपस्थितीची गरज भासणार नाही.
Love Marriageकेल्यावर तिनं त्याला गंडवलं, अशी अट ठेवली की, पतीने थेट पोलीस ठाण्यात धाव
हा पराक्रम 2030पर्यंत शक्य होऊ शकतो, असा दावा कुर्जवील यांनी केला आहे. `सध्या माणूस अमरत्वाचं रहस्य उलगडण्याच्या अगदी जवळ आहे. येत्या दहा वर्षांत हा चमत्कार घडण्याची शक्यता आहे,` असं कुर्जवील यांनी स्पष्ट केलं आहे. रे कुर्जवील यांची ही भविष्यवाणी कितपत खरी ठरते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.