मुंबई, 10 एप्रिल : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली असून यात दररोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. आज आयपीएल 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात विराट कोहली, कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेल यांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. या दरम्यान प्लेसिसच्या बॅटमधून निघालेला एक सिक्स थेट स्टेडियमच्या बाहेर जाऊन पडला.
आरसीबीचे होम ग्राउंड असलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात सुरुवातीला लखनऊ सुपर जाएंट्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांची जोडी मैदानात उतरली. दोघांनी मैदानात येताच चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यास सुरुवात केली.
विराट कोहली 44 चेंडूत 61 धावा करून बाद झाला परंतु त्यानंतरही कर्णधार प्लेसिस मॅक्सवेल सोबत मैदानात फटकेबाजी करीत होता. प्लेसिसने 49 चेंडूत 79 धावा केल्या यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 5 षटकार लगावले. यावेळी प्लेसिसने मारलेला एक षटकार एवढा जबरदस्त होता की तो थेट चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर असलेल्या पार्किंग लॉटमध्ये जाऊन पडला.
In the slot and BOOM 🎇
When @faf1307 hits it, it stays hit 😉
200 up for @RCBTweets! #TATAIPL | #RCBvLSG
Describe those two sixes with an emoji 🔽 pic.twitter.com/fg9twXiDXl
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.