चंद्रपूर : ता.०९
आयसीआयसीआय बँकेच्या सीएसआर निधीतून ब्रम्हपुरी सिंदेवाही, सावली तालुक्यासाठी चार फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध झाली आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे. नागरिकांनी या फिरत्या दवाखान्यांचा लाभ घ्यावा.ब्रम्हपुरी येथे आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज फिरत्या दवाखान्यांचे (मोबाइल क्लिनीक व्हॅन) नुकतेच लोकार्पण करण्यात आले.फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, डेंगी, मलेरिया आदी संसर्गजन्य आजारांची चाचणी करून मोफत औषधोपचार केला जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्याने नागरिकांनी सुध्दा तपासणी करून घ्यावी.सदर उपक्रमाचे समन्वयक म्हणून कौस्तुभ बुटाला हे जबाबदारी पार पाडत असून रेव्हमॅक्स टेलिकॉम इन्फ्रास्ट्रकचर प्रा.लि.चे सारंग मोदी, नरेश चौधरी, प्रतिक आचार्य यांचे सहकार्य लाभले.