मुंबई : आयपीएलमध्ये फिल्डिंग करताना केन विल्यमसनला दुखापत झाली. त्यामुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावं लागलं. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे तो पुढचे काही महिने मैदानापासून बाहेर राहणार आहे. केन आयपीएल 2023 मध्ये गुजरात टीमकडून खेळत होता.
या हंगामातील पहिल्या सामन्यात तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळत असताना फिल्डिंग करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. गुडघ्याच्या दुखापतीनंतर त्याला मैदान तातडीनं सोडावं लागलं.
गुडघ्याच्या दुखापतीनंतर, तो आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे आणि तो न्यूझीलंडला परतला. 5 एप्रिल रोजी त्याच्या गुडघ्याचं स्कॅनिंग करण्यात आलं. उजव्या गुडघ्यावर ऑपरेशन करावे लागेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, केन विल्यमसनची शस्त्रक्रिया येत्या तीन आठवड्यांत होणार आहे. केन विल्यमसनने सांगितले की, त्याच्या रिकव्हरीला थोडा वेळ लागेल. त्याचवेळी मैदानात परतण्याबाबतची त्याची अस्वस्थताही स्पष्टपणे दिसून येत होती. तो मैदानात परतण्यासाठी आतूर असल्याचं दिसत होतं.
IPL 2023: गब्बरमुळे टीममधील खेळाडू जखमी, LIVE मॅचदरम्यान मैदान सोडण्याची वेळ
केनची ही दुखापत पाहता त्याला वन डे वर्ल्डकप खेळता येईल की नाही ही मोठी शंका आहे. एवढंच नाही तर सतत होणाऱ्या दुखापतींमुळे केन क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडणार का? संन्यास घेणार का अशीही एक चर्चा सुरू झाली आहे. मात्र या सगळ्यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. येत्या काही दिवसांत केनच्या फिटनेसवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
Painful to see Kane Williamson in this situation!
Wishing him a speedy recovery. pic.twitter.com/cngFRlQiyg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 4, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.