रवी पांडे (वाराणसी), 18 मे : उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. फेसबुक लाईव्ह करत एका 32 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी व्यक्तीने वडिलांना आणि पत्नीला एक निरोप दिला आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या या मृत्यूचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारा तरुण हा वाराणसीतील एका प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्याचा लहान भाऊ असून त्याचे नाव कानद आहे. कानद हा पाच भावांमध्ये सर्वात लहान आहे.
वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते, परंतु कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्या व्यक्तीस अंमली पदार्थांचे व्यसन होते, वडील हयात असतानाही तो मालमत्तेत वाटा मागत होता यामुळे त्याचे कोणाशी पटत नव्हते.
कानदची पत्नी काही कामानिमीत्त सासरच्या दुसऱ्या घरी गेली होती. त्यावेळी कानद घरी एकटाच होता. रात्री 10.30 च्या सुमारास तो फेसबुकवर लाइव्ह आला, आत्महत्या करण्यापूर्वी कानदने त्याचे वडील आणि पत्नीला एक मेसेज दिला आहे. त्याने पत्नीची माफी मागितली आणि वडिलांना घाबरू नका असा सल्ला दिला आहे.
तो म्हणाला की, घरातून हरवले. त्याच्या भावांना हरवले. मी काही लोक गमावले ज्यांना मी स्वतःचे समजत होतो. मी माझ्या पत्नीची माफी मागतो, मी माझ्या कुटुंबाची आणि वडिलांची माफी मागतो. बाबा, मी तुझ्या लायक कधीच असू शकत नाही असे तो फेसबुकद्वारे म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.