मुंबई, 12 मे: बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्हस्टोरी घडल्या, ज्या अपूर्ण राहिल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला चित्रपटांच्या दुनियेतील अशाच एका अधुऱ्या प्रेमकहाणीबद्दल सांगणार आहोत. ही लव्हस्टोरी राजेश खन्ना आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांची आहे. अंजू महेंद्रू यांची 70 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींमध्ये गणना होते. सध्या या अभिनेत्रीचा एक जुना फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचा हा फोटो पाहून कोणाचीही फसवणूक होऊ शकते. या फोटोतील अंजू महेंद्रूला ओळखणे खरोखर कठीण आहे.
अंजू महेंद्रूने वयाच्या 13 व्या वर्षी मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. प्रसिद्ध कवी कैफी आझमी यांनी तिला पहिल्यांदा पाहिले, त्यानंतर त्यांनी बासू भट्टाचार्य यांना अंजूबद्दल सांगितले. अंजूने 1966 मध्ये बासू भट्टाचार्य यांच्या ‘उसकी कहानी’ चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केले, मात्र त्यांना कोणत्याही चित्रपटातून फारसे यश मिळू शकले नाही. अंजू महेंद्रू बहुतेक चित्रपटांमध्ये साईड रोलमध्ये दिसली होती.
चित्रपटांमध्ये फारसे यश न मिळाल्यानंतर, अभिनेत्री टीव्ही इंडस्ट्रीकडे वळली. अभिनेत्रीला टीव्हीच्या जगात खूप यश मिळाले. तिने अनेक शो केले. एवढंच नाही तर ती अजूनही छोट्या पडद्यावर खूप सक्रिय आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अंजू राजेश खन्नासोबतच्या नात्यामुळेही बरीच चर्चेत राहिली.
राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू जवळपास 7 वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्याच काळात राजेश खन्ना चित्रपटांमध्ये प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते. पण अंजू अजूनही चित्रपटांमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी धडपडत होती. अशा परिस्थितीत अंजूने करिअर सोडून त्याच्याशी लग्न करावे अशी अभिनेत्याची इच्छा होती, पण अभिनेत्रीला स्वतःची ओळख निर्माण करायची होती, म्हणून तिने लग्नाला नकार दिला.
राजेश खन्नासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंजू महेंद्रूचे नाव अनेक लोकांसोबत जोडले गेले, पण तिचे कोणाशीही नाते फार काळ टिकू शकले नाही. अंजू महेंद्रूने राजेश खन्नानंतर नंतर अनेकांना डेट केले, पण तिने कोणाशीही लग्न केले नाही. तर राजेश खन्ना यांनी डिंपल कपाडिया सोबत लग्न करत संसार थाटला.
त्यानंतर अनेक वर्षांनी राजेश आणि मंजू यांची पुन्हा भेट झाली. असं म्हटलं जातं कि, ‘आपल्या करिअरच्या उत्तरार्धात राजेश खन्ना सतत मिळणाऱ्या अपयशामुळे तणावग्रस्त झाले आणि ते चिडचिडे झाले. अशा वेळी त्यांना अंजू महेंद्रू यांच्या पाठिंब्याची सर्वाधिक गरज होती. चित्रपट पत्रकार भावना सोमाया यांच्या मते, ‘एक दिवस राजेश खन्ना यांनी अंजू महेंद्रूला फोन केला आणि अंजूने तिला घरी बोलावले. हा तोच बंगला होता जो त्यांनी अंजूला एकदा गिफ्ट केला होता. त्यानंतर राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांची मैत्री पुन्हा जिवंत झाली. अंजू राजेशची सर्वात जवळची मैत्रीण बनली. तीही काकांच्या ऑफिसचे काम बघू लागली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.