मुंबई, 18 एप्रिल: बॉलीवूडचे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या बॉलिवूड सेलिब्रिटीचे लहानपणीचे फोटो व्हायरल होत आहेत. कधी-कधी बॉलीवूड सेलिब्रिटी स्वतःचे बालपणीचे फोटो फॅन्ससोबत शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर 90 च्या दशकातील एका टॉप अभिनेत्रीच्या फोटोचा बोलबाला आहे. हा फोटो समोर आल्यापासून चाहते या अभिनेत्रीला ओळखण्यासाठी उत्सुक झाले आहेत. चला तर मग बघूया फोटोत दिसणारी ही मुलगी तुम्हाला ओळखता येते की नाही.
जर तुम्हाला ओळखता येत नसेल तर आम्ही काही हिंट देतो. फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या शेजारी बसलेली ही मुलगी ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत सामील होती. या अभिनेत्रीने अक्षय कुमार, गोविंदा, अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ही अभिनेत्री बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी आहे. तिने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या अॅक्शन फिल्मद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.एवढंच नाही तर या अभिनेत्रीला नुकतंच पद्मश्री सन्मान देऊन गौरविण्यात आलं आहे.
जर तुम्ही अजूनही या अभिनेत्रीला ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की फोटोमध्ये दिसणारी मुलगी रवीना टंडन आहे. रवीना टंडन ही बॉलिवूड दिग्दर्शक रवी टंडन यांची मुलगी आहे. 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीला पहिल्याच चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात रवीना टंडनसोबत सलमान खान मुख्य भूमिकेत दिसला होता.
रवीना टंडनने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ही अभिनेत्री ‘दिलवाले’, ‘मोहरा’, ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. रवीना टंडन तिच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत आली होती.
आजही रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्यातील नात्याची चर्चा बॉलिवूडमध्ये होते. या अभिनेत्रीने अक्षय कुमारसोबत एंगेजमेंटही केली होती, पण नंतर त्यांचे नाते तुटले. 2004 मध्ये रवीना टंडनने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.