वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी
वर्धा, 18 एप्रिल : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावकऱ्यांचा सहभाग घेतला जात आहे. या प्रकल्पातून सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या योजना देखील राबविल्या जातात. वर्धा जिल्ह्यातील शिवणगाव येथील एका महिलेने यातील वैयक्तिक लाभाच्या योजनेचा फायदा घेत स्वतःचा बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून प्रतिभा नंदकिशोर गेडाम यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे आणि भूमिहीन कुटूंब आत्मनिर्भर झाले आहे.
वैयक्तीक योजनेचा गेडाम यांना लाभ
तुमच्या शहरातून ( वर्धा)
कृषी संजीवनी प्रकल्पात महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रकल्प गावामध्ये महिला कृषीमित्र म्हणजे कृषी ताईंची नेमणूक करण्यात आली आहे. शिवणगावच्या कृषीताई वैशाली रायफुले यांनी प्रकल्पातील सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या योजनेबाबत प्रतिभा गेडाम यांना सांगितले. वैयक्तिक योजनेच्या लाभांतर्गत बंदिस्त शेळीपालनकरिता त्यांचा अर्ज दाखल करून घेतला होता.
शेळीपालनातून आर्थिक फायदा
उमेद अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गटाकडून 80 हजाराचे कर्ज घेतले. या पैशातून त्यांनी 10 शेळ्या व एक बोकड खरेदी केला. आपल्या बंदिस्त शेळीपालनास सुरुवात केली. यासाठी त्यांना उमेदकडून 26 हजार 938 रुपयांचे अनुदान देखील प्राप्त झाले. या अनुदानातून त्यांनी बचतगटाचा कर्जाचा हप्ता भरला. शेळीपालन व्यवसायातून आतापर्यंत त्यांनी सहा शेळ्या, चार बोकड व लेंडीखत विकून चांगले उत्पन्न मिळविले आहे.
Latur News : लातूरच्या गृहिणीने बनवले तब्बल 56 प्रकारचे लोणचे, पाहा कशी केली ही किमया! Video
आत्मनिर्भर होण्याचा आदर्श
आज रोजी प्रतिभा गेडाम यांच्या बंदिस्त शेळीपालनामध्ये 9 पिल्ले व 15 मोठ्या शेळ्या आहेत. गेडाम यांनी उपलब्ध साधनांचा योग्य पद्धतीने लाभ घेऊन प्रतिकुल परिस्थितीमध्ये अनुकुल असे उपजिविकेचे साधन निर्माण केले आहे. प्रतिभा यांनी इतर महिलांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे कुटुंबाला आर्थिक स्थैर्य निर्माण होऊ शकले, असे त्या सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.