पणजी, 24 एप्रिल : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी सहकुटुंब गोव्याला गेला आहे. सचिनचा आज 24 एप्रिलला 50वा वाढदिवस आहे. दरवर्षी सचिनचे चाहतेही त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करतात. सचिन यावेळी त्याच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन गोव्यात करणार आहे.
सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली आणि मुलगी सारासोबत गोव्याला गेला आहे. दरम्यान, आजच मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादमद्ये सामना होणार आहे. त्यामुळे अर्जुन तेंडुलकर सचिनच्या वाढदिवसासाठी सोबत नसल्याचं म्हटलं जातंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.