कोलंबिया, 14 एप्रिल : लोकशाही ही कोणत्याही देशाची मोठी ताकद असते. देशातील जनता स्वतःचा नेता निवडते आणि त्याच्या धर्तीवर देशाचं काम चालते. जनता नेत्याला निवडून देते, आपल्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी त्याची असते. मात्र अनेकवेळा निवडून आल्यानंतर हे नेते आपली जबाबदारी विसरतात. त्यांचा हेतू केवळ नफा आणि गरजा पूर्ण करणं हाच असतो. सत्तेच्या नशेत असलेल्या अशाच एका नेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एका नेत्याच्या व्हिडीओने खळबळ उडाली आहे. एका पार्टीत नेता अश्लील कृत्य करताना दिसला. नाईट क्लबमध्ये हा नेता दिसला. तिथं त्याने आपली मर्यादाही ओलांडली. नाईट क्लबध्ये दारू पिऊन टल्ली झालेला हा नेता. तितक्यावरच थांबला नाही. तर त्याने त्यानंतर जे केलं ते धक्कादायक आहे. त्याने नशेत आपले सर्व कपडे काढले. तिथं बऱ्याच महिला होत्या, त्यांच्यासमोर तो नग्न अवस्थेत होता.
नेत्याचं हे नको ते कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं. ते इतके नशेत होते की कुणीतरी आपले फोटो काढत आहे, आपला व्हिडीओ काढत आहे, याचं भानही त्यांना नव्हतं. शेवटी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आता ते वादात सापडले आहेत.
‘मोदीजी आज माझंही ऐका…’; काश्मिरी चिमुकलीने पंतप्रधानांना दाखवलं भयाण वास्तव; Watch Video
हा नेता म्हणजे मार्टिन अल्फान्सो मेजिया. जे कोलंबियाचे महापौर आहेत. नाईटक्लबमध्ये ते अर्धनग्न अवस्थेत डान्स करताना दिसले. त्यांचं हे लज्जास्पद कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
कोलंबियाच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे सदस्य डुवालियर सांचेझ अरांगो म्हणाले, “राजकारण्यांची जबाबदारी आहे की ते जनतेमध्ये त्यांच्या प्रतिमेबद्दल जागरूक राहतील. मार्टिन अशी पार्टी करणारा सामान्य माणूस नाही. त्यांच्याकडे एक पद आहे जे खूप जबाबदारीचं आहे. त्यांनी त्यांच्या पदाची काळजी घ्यायला हवी होती”
VIDEO – अजब प्रकरण! श्वानाने मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्याचा आरोप; पोलिसात तक्रार, अटकेची मागणी
@RCN980cali ट्विटर अकाऊंटवर हा शॉकिंग व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यात हा नेता आपले संपूर्ण कपडे काढून नाचताना दिसत आहेत.
#Regiones 🚨 Hay polémica en #Calima– #ElDarién, luego de que se viralizara un video del alcalde, Martín Alfonso Mejía, bailando borracho y semidesnudo en una discoteca de dicha localidad. HILO ⬇️ pic.twitter.com/1HxrFYPktU
— RCN Radio Cali (@RCN980cali) April 10, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.