टेक्सास : बसची वाट पाहात स्टॉपवर प्रवासी उभे होते. मात्र त्यांना याची जराही कल्पना नव्हती की बसऐवजी आपला मृत्यूच आपल्या समोर येऊन उभा ठाकेल. बसची वाट पाहाच उभ्या असेलेल्या प्रवाशांना भरधाव कारनं चिरडलं आहे. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी व्यक्तींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केलं आहे. ब्राउन्सविले पोलीस अधिकारी मार्टिन सँडोव्हल यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात यूएस वेळेनुसार सकाळी 8.30 च्या सुमारास झाला.
भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली अन् अडकलेल्या 4 जणांसोबत घडलं भयानक
The Migrant accident in Brownsville, looks intentional to me 7 Dead and 4 severely injured#Brownsville #texas #crash pic.twitter.com/eivSM2PgHY
— The Trent Cannon (@TheTrentCannon) May 7, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.