पुणे 30 एप्रिल : पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याठिकाणी ट्रॅव्हलसने ड्रग्ज घेऊन येणाऱ्या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या घटनेत जवळपास सव्वा कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेतील आरोपी क्रमांक 1 आणि 2 हे शनिवारी रतलाम येथून एमडी हे ड्रग्ज घेऊन ट्रॅव्हल्सने खराडी बस स्टॉपला उतरले. आरोपी क्रमांक तीन हा तिथे त्यांची वाट पाहत थांबलेला होता. आरोपींची अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक किलो 108 ग्रॅम एमडी हे ड्रग्ज आढळून आले. याची किंमत सुमारे 1,21,60,000/ (एक कोटी 21 लाख) इतकी आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
आझाद शेरजमन खान (वय 35) राहणार पिंपळखेडी तालुका अलोट जिल्हा रतलाम, मध्य प्रदेश असं यात पकडल्या गेलेल्या एका आरोपीचं नाव आहे. तर, नागेश्वर रामेश्वर प्रजापती (वय 35) रा.अलोट जिल्हा रतलाम, मध्य प्रदेश असं दुसऱ्या आरोपीचं नाव आहे. विशेष म्हणजे या घटनेतील तिसरा आरोपी हा अल्पवयीन असून त्याचं वय 16 वर्ष आहे.
हे सर्व खराडी बस स्टॉपजवळ उभे असलेले आढळून आले. यावेळी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सव्वा कोटी किमतीचे ड्रग्ज आढळून आले. हे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून आरोपाींनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.