हिंगोली, 17 मे : हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये एका तरूणाला आठ ते दहा जणांनी लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केली आहे. उपचारादरम्यान त्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. ओमकार हेरे असं मयत युवकाचे नाव आहे. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. बहिणीकडे का बघतोस आणि तिला मेसेज का करतो? या कारणावरून या युवकाला गंभीर मारहाण करून नांदेड रोड भागात टाकून देण्यात आलं होतं, अशी तक्रार मयत तरूणाच्या वडिलांनी पोलिसांत दिली आहे.
नांदेडला उपचारादरम्यान या तरूणाचा आज मृत्यू झाला आहे. दरम्यान या युवकाच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह थेट वसमत शहर पोलीस ठाण्यात आणला होता. जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात दहा ते बारा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.