नील कमल (झारखंड) 16 मे : झारखंडमध्ये मागच्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे तिथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान झारखंडच्या पलामू पंचायतीमध्ये झालेल्या तुघलकी निर्णयानंतर एका मुलीला अमानुष वागणूक दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. लग्नास नकार दिल्याने पंचायतीच्या निर्णयानंतर मुलीचे केस कापून चप्पलचा हार घालून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यादरम्यान मुलीस मारहाण करून गावाबाहेरील जंगलात बेशुद्धावस्थेत सोडण्यात आले. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पीडित मुलीला मेदिनी राय मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिच्या आई-वडिलांचे 8 वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. मालमत्ता बळकावण्यासाठी मोठी बहीण आणि चुलत भावाला माझं लग्न करायचे आहे. पण मला लग्न करायचे नाही.
माझ्या बहिणीने 19 एप्रिल रोजी जबरदस्तीने अचानक घरी लग्नाची मिरवणूक बोलावली आणि माझं लग्न लावून देत होती. यावेळी मी तिथून पळून गेले होते. मी मागच्या 2 दिवसांपूर्वी घरी परतलो तेव्हा संपूर्ण गावातील लोकांनी पंचायत आयोजित करून मला अमानुष वागणूक दिली.
भावा-बहिणीचं लग्न तर कुठे मामा-भाचीचं, जाणून घ्या लग्नाच्या विचित्र प्रथा
पीडितेने असेही सांगितले की, तिच्या चुलत भावाच्या नेतृत्वाखाली पंचायतीने आदेश दिला. यानंतर माझे केस कापल्यानंतर, चप्पलचा हार घालून संपूर्ण गावात तिची धिंड काढून गावाबाहेरच्या जंगलात सोडले.
तलावात खेळत असताना लहान मुलांवर पाणघोड्याचा हल्ला, Shocking Video व्हायरल
दरम्यान महिला कॉन्स्टेबलने दिलेल्या माहितीनुसार, पीडितेवर पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. स्टेशन प्रभारी गुलशन ग्रोवर म्हणाले की, मुलीच्या वक्तव्यावरून पाटण पोलिस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस संबंधितांना अटक करतील ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.