ठाणे, 09 मे : मासिक पाळीबाबत असलेलं अज्ञान आणि वहिनीने दिलेल्या चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवून मोठ्या भावाने लहान बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. उल्हासनगरमध्ये सख्ख्या भावाने लहान बहिणीचा छळ करून त्यानंतर खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भावाला अटक केलीय. संशयित आरोपी असलेला भाऊ सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता.
काही दिवसांपूर्वी त्याच्या लहान बहिणीला पहिल्यांदाच मासिक पाळी आली. यावेळी होणारा रक्तस्राव पाहून भावाला वेगळाच संशय आला. याच संशयातून त्याने बहिणीचा खून केला. आपल्या बहिणीचे कोणासोबत तरी संबंध असल्याचं भावाला वाटलं. त्यामुळेच रक्तस्राव होत असल्याच्या संशयातून संतापलेल्या भावाने बहिणीला बेदम मारहाणसुद्धा केली. तिच्या अंगाला चटकेही देण्यात आले. यातच मुलीचा मृत्यू झाला.
अनैतिक संबंधाने घेतला सहा वर्षाच्या चिमुकल्याचा बळी, आईसह प्रियकराला अटक
तुमच्या शहरातून (मुंबई)
उल्हासनगरमध्ये १२ वर्षांची मुलगी तिचा मोठा भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. मुलीचे आई वडिल गावाकडे राहतात. या मुलीला काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदा पाळी आली. त्यावेळी मुलीच्या भावाला त्याच्या पत्नीने चुकीची माहिती दिली. बहिणीचे प्रेमसंबंध असून शारीरिक संबंधामुळे रक्तस्राव झाल्याचं तिने सांगितलं. यामुळे संतापलेल्या भावाने बहिणीचा तीन दिवस छळ केला. तिला अक्षरश: लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
मारहाणीमुळे जखमी झालेल्या १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर भावानेच तिला जिल्हा रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. जेव्हा शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा शरिरावर चटके दिल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आढळल्या. डॉक्टरांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी भावाविरुद्ध खून प्रकरणी गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली.
पुण्यात 60 हजार रुपयात दहावी, बारावी पास; बनावट प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघडकीस
पोलिसांनी सांगितले की, मुलीला मासिक पाळी सुरू झाल्यानं तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग पडले. त्याबद्दल मुलीकडे भावाने विचारणा केली. पण तिला यावर काही उत्तर देता आलं नाही. त्यावेळी मुलीच्या वहिनीने तिचे कोणासोबत तरी प्रेमसबंध आहेत आणि त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानं तिला रक्तस्राव होतोय असं सांगितलं. हे ऐकून भाऊ संतापला आणि त्याने बहिणीला जबर मारहाण केली. यानंतर तिला चटकेही देण्यात आले. तिच्या शरिरावर असणाऱ्या चटक्यांच्या खुणांमुळेच या प्रकरणाचा उलगडा झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.