मुंबई, 08 मे : ठाण्यात रामकथा वाचन करण्यासाठी आलेल्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. रामकथा सुरू होण्याआधी त्यांना ही नोटीस देण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लेखी तक्रारीनंतर पोलिसांनी ही नोटीस पाठवली होती.
रविवारी ठाण्यातील अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे तीन दिवसांचा रामकथा आणि हनुमान कथा कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी हनुमान कथा सुरू केली. पण कथा सुरू होण्याआधी वंचित बहुजन आघाडी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने लेखी पत्र देत म्हटलं की, बागेश्वर धामच्या बाबांनी कोणतंही असं वक्तव्य करू नये ज्यामुळे कायदा व्यवस्थेत अडचण निर्माण होईल.
राजस्थानमध्ये हवाई दलाचं विमान कोसळलं, दोघांचा मृत्यू
तुमच्या शहरातून (मुंबई)
अंबरनाथ शिवाजी नगर पोलीसांनी धीरेंद्र शास्त्रींना कलम 149 अंतर्गत नोटीस जारी केली. आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रवचनासाठी दोन ते अडीच लाख भक्त सहभागी झाले आहेत.
रविवारी लाखो भाविक उपस्थित राहिल्याने शिव मंदिराच्या परिसरात गर्दी नियंत्रित करताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. पहिल्या दिवशी भाबा धीरेंद्र शास्त्रींच्या दरबारात सहभागी होण्यासाठी २ लाख भक्त आले होते. महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधूनही मोठ्या संख्येने भाविक आले होते.
धीरेंद्र शास्त्रींनी 7 मे रोजी हनुमान कथा सुरू केली. 8 मे रोजी दिव्य दरबार 4 ते 6 या वेळेत असणार आहे. त्यानंतर 9 मे रोजी 5 ते 8 या वेळेत हनुमान कथा कार्यक्रम असेल.
याआधी 6 आणि 7 नोव्हेंबर 2022 रोजी ठाण्यात भिवंडीमध्ये दिव्य बालाजी दरबार आयोजित केला होता. त्यावेळी उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी भारतीय निगम माइल स्टोनमध्ये बागेश्वर धाम यांचे मंदिर आणि आश्रम उभारण्याचा निर्णय घेतला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.