विजय देसाई, प्रतिनिधी
मीरा भाईंदर, 12 मे : मीरा रोड येथील बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी करून भाविकांचे दागिने लुटण्यात आले होते, याप्रकरणी आठ जणांना मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने आपला जीव धोक्यात घालून पकडलं. आरोपींकडून पोलिसांनी 50 लाखांचे दागिने हस्तगत केले, यानंतर 12 जणांना त्यांचे दागिने पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते परत करण्यात आले.
बागेश्वर धाम म्हणून प्रसिद्ध असलेल्या धीरेंद्र शास्त्रीचा कार्यक्रम दीड महिन्यापूर्वी मीरा रोड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार गीता जैन यांनी केले होते. या कार्यक्रमाबाबत देशपातळीवर चर्चा झाल्यामुळे विविध राज्यातून तसेच जिल्हातून कार्यक्रम पाहण्यासाठी त्यांच्या भक्तांनी मोठी गर्दी केली होती. याच गर्दीचा फायदा उचलत चोरांनी देखील हात-सफाई करून सुमारे 60 पुरुष आणि महिलांचे दागिने चोरी केले असल्याची बाब समोर आली होती. याबाबत मीरा रोड पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले होते.
तुमच्या शहरातून (मुंबई)
कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी जागरूक नागरिक रोहित गुप्ताच्या मदतीने पोलिसांनी सहा आरोपीना रंगेहाथ कार्यक्रम स्थळी अटक केली होती. प्रत्येक नागरिकाने समाजात वावरताना सजग राहिले पाहिजे आणि पोलिसांना मदत केली पाहिजे, असं गुप्ता यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी राजस्थान मधून चोरी करण्यासाठी बावरिया टोळी आली होती. ते प्रसिद्ध धर्मगुरूंच्या कार्यक्रम स्थळांना टार्गेट करून चोरी करतात. ज्या ठिकाणी महिला आहेत त्याठिकाणी बावरिया टोळीच्या महिला आणि पुरुष एकत्र येवून चेंगराचेंगरी करून गळ्यातील सोनसाखळ्या लांबवायचे ती चेन तोंडात ठेवून माहोल शांत झाल्यावर ती दुसऱ्या इसमाच्या ताब्यात देवून पसार व्हायचे.
पिडीत भाविकांना बाबा पावला नाही, मात्र मीरा भाईंदर पोलीस पावले. नागरिकांना गर्दीत जावून नये असा सल्ला दागिने मिळाल्यानंतर महिलांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.