राहुल कौशिक (भिलवाडा), 29 एप्रिल : राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बागेश्वर धामला जातो म्हणून गेलेल्या व्यक्तीची हत्या झाल्याचे माहिती समोर आली आहे. भिलवाडा येथील परिसरात मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवली आहे. श्याम सुंदर त्रिपाठी असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हा बागेश्वर धामला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. नंतर चामुंडा माता मंदिराजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. चामुंडा मंदिराजवळ सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवताना मृताच्या भावाने खुनाचा आरोप केला आहे.
दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याची गोळ्या झाडून हत्या, पोलिसही हादरले
वास्तविक, मयत हा दोन दिवसांपूर्वी बागेश्वर धामला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता आणि घरी परतलाच नाही. दरम्यान पोलिसांनी मृतांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून तपास सुरू केला आहे. मृताचा भाऊ सोनू त्रिपाठी याच्या माहितीनुसार, माझा भाऊ श्याम सुंदर त्रिपाठी हा 26 एप्रिल रोजी बागेश्वर धामला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता.
त्यानंतर त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. आमच्या भावाला कोणीतरी मारून टाकून दिल्याचे आम्हाला वाटते. त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या असून त्याचा मोबाईलही गायब आहे.
धक्कादायक! पुण्यात सहावीतली विद्यार्थीनी गरोदर, पोटात दुखतंय म्हणून गेली होती दवाखान्यात
याचबरोबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चामुंडा माता मंदिराजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाची ओळख आम्हाला पटलेली आहे. हा खून आहे की दुसरे काही याची आम्ही शहानिशा करणार असल्याचे पोलिसांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.