रांची, 23 मे : जुळ्या मुलांच्या जन्माची बातमी तुम्ही अनेकदा ऐकली असेल. पण आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, ते ऐकून तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. सध्या मुलांच्या जन्मासंदर्भात अशीच एक बातमी समोर आली आहे. एका महिलेनं एकाचवेळी तब्बल पाच बाळांना जन्म दिलाय. झारखंड राज्यातील रांची येथील एका हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडलाय. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.
रांची येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये एका महिलेनं एकाचवेळी पाच बाळांना जन्म दिलाय. रिम्स हॉस्पिटलनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती दिली. सध्या आई आणि बाळंची प्रकृती ठीक आहे. नवजात बाळं सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून या मुलांचं वजन सुमारे 1 किलो ते 750 ग्रॅमपर्यंत आहे.
महिनाभरापूर्वी घडली होती अशी दुर्मिळ घटना
विशेष म्हणजे रिम्स हॉस्पिटलमध्ये महिनाभरापूर्वीच एका महिलेनं एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला होता. ही सर्व मुलं व आईची प्रकृती व्यवस्थित होती. या सर्वांना नंतर घरी पाठवण्यात आलं होतं. त्यातच आता पुन्हा एकदा रिम्समध्ये एका महिलेनं एकाचवेळी पाच मुलांना जन्म दिल्याची वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ अशी घटना घडलीय.
बाबो! हे असं कसं बाळ? चिमुकल्याचे हातपाय पाहून डॉक्टरही शॉक; पाहा PHOTO
मुलांचे वजन कमी
एकाचवेळी पाच मुलांना जन्म देणाऱ्या महिलेची प्रसूती डॉ. शशिबालासिंग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. संबंधित महिला इटखोरी, चतरा येथील रहिवासी आहे. सध्या तिच्या पाचही नवजात बालकांना निओनॅटोलॉजी विभागात दाखल करण्यात आलंय. या मुलांचं वजन खूप कमी आहे. मात्र, सध्या आई आणि मुलांची प्रकृती ठीक असून डॉक्टरांचं एक पथक आई आणि मुलांवर लक्ष ठेवून आहे.
ही मुलं प्री-मॅच्युअर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, ‘या मुलांचा जन्म 26-27 आठवड्यांत झालाय. त्यामुळे त्यांच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवणं आवश्यक असून, त्या दृष्टीनं मुलांची योग्य काळजी घेतली जातेय.’
घरात सापडला 15 वर्षांचा कोब्रा, शेपटी पकडली तर बुटाला घेतला चावा, PHOTOS
दरम्यान, सोशल मीडियावर नेहमीच अशा बातम्या समोर येत असतात. ज्या अनेकदा आश्चर्यचकित करणाऱ्या असतात. रांची येथील रिम्स हॉस्पिटलनेसुद्धा जेव्हा एकाचवेळी महिलेनं पाच मुलांना जन्म दिल्याची माहिती ट्विटवरून शेअर केली, तेव्हा त्यावर सहजासहजी अनेकांना विश्वास ठेवणं कठीण झालं. मात्र, वैद्यकीय क्षेत्रात दुर्मिळ अशी समजली जाणारी ही घटना सध्या रांची परिसरात चांगलीच चर्चेत आहे. अनेकजण संबंधित बाळांची प्रकृती कशी आहे, याबाबत माहिती घेत आहेत. तर, हॉस्पिटलच्या वतीनेही सातत्याने संबंधित महिला व नवजात मुलं यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जातेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.