मुंबई : लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांत पोलिसांकडून कायद्यानुसार पीडित मुलाची किंवा मुलीची माहिती ओळख गुप्त ठेवली जाते. पण बालकांवर अत्याचार करणारी व्यक्ती नातेवाईक किंवा खूप जवळची असेल, तर काहीजण पोलिसांकडे तक्रार देणं टाळतात.
प्रोफेशनल मॉडेल आणि सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोहिनी दत्ता हिच्याबाबतीतसुद्धा असंच काहीसं घडलं होतं. त्यानंतर तिनं अशी काही कृती केली की, ती आता अनेकांसाठी प्रेरणा बनलीय. खुद्द सोहिनी दत्ता हिनंच तिच्यासोबत घडलेला अत्याचाराचा प्रसंग जाहीररित्या सांगितलाय. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिलंय.
सोहिनी ही वयाच्या 15 व्या वर्षी लैंगिक अत्याचाराचा बळी ठरली होती. सोहिनीवर अत्याचार करणारी व्यक्ती तिच्या मावशीचा नवराच होता, व त्या नराधमाचं वय सोहिनीच्या वडिलांच्या वयाइतकं होतं. खुद्द सोहिनीनं याबाबत खुलासा करीत तिच्यासोबत घडलेल्या त्या दुर्देवी प्रसंगाची माहिती दिली. इतर बालकांना अशा घटना रोखण्यासाठी बळ मिळावं, ते अशा घटनांना बळी पडू नयेत, यासाठी तिनं याचा खुलासा केलाय.
लग्नाच्या चर्चेदरम्यान पहिल्यांदाच एकत्र दिसले सनीचा मुलगा आणि होणारी सून, यादिवशी अडकणार लग्नबंधनात
सोहिनीवर तिच्या मावशीच्या नवऱ्याने एकदा नाही तर अनेकदा अत्याचार केला. त्यामुळे ती इतकी घाबरली होती की, तिनं घरापासून दूर जाऊन अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. पण, तिथे गेल्यानंतरसुद्धा तिच्याबाबत जे काही घडलं होतं, हे तिला विसरता येणं शक्य नव्हतं. ती डिप्रेशनमध्ये गेली. तिला कोणी हात लावला तरी ती घाबरायची. तिच्याबाबत झालेली घटना ती कोणाला सांगू शकत नव्हती. अगदी स्वतःच्या आई वडिलांनासुद्धा नाही.
फोनवर रेकॉर्डिंग करून आई-वडिलांना ऐकवलं
एके दिवशी सोहिनीनं ठरवलं की आता सत्य सर्वांसमोर आणणं गरजेचं आहे. स्वतःसारखा लैंगिक अत्याचाराचा त्रास इतर कोणत्याही मुलीला किंवा मुलाला सहन करावा लागू नये, हा एकच उद्देश त्यामागे होता. तिनं अतिशय हुशारीनं फोनवर बोलत तिच्या मावशीच्या नवऱ्याकडून कबूल करून घेतलं की, तो तिच्यासोबत कोणत्या प्रकारची घृणास्पद कृत्यं करत असे.
‘मला खेळण्यासारखी वागणूक…’ म्हणून आमिरसोबत काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीनं अचानक सोडलं बॉलिवूड
मावशीच्या नवऱ्यासोबत बोलतानाचा हा फोन तिनं रेकॉर्ड केला. त्यानंतर तिनं हे संपूर्ण रेकॉर्डिंग तिच्या आई-वडिलांशी शेअर केलं. तेव्हा मुलीच्या वेदना त्यांनाही समजल्या. त्यानंतर तातडीने त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली, व सोहिनीवर अत्याचार करणारा तिच्या मावशीच्या नवऱ्याला अटक झाली.
सोहिनीनं तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या विरोधात तक्रार देण्याची हिंमत दाखवल्यानंतर लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या इतर मुलींना, मुलांना पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी हिंमत मिळावी, यासाठी ती स्वतःबाबत घडलेला अत्याचाराचा प्रसंग जाहीररित्या सांगत असते. आता ती अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे. तिच्यामुळे इतरांनासुद्धा अशा घटनांच्या विरोधात लढण्यासाठी हिंमत मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.