पाटणा 29 एप्रिल : 26 एप्रिल रोजी राजधानीत घडलेल्या अडीच महिन्यांची मुलगी आंशीच्या हत्येप्रकरणी पाटणा पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. ज्या व्यक्तीने मुलीची हत्या केली तो दुसरा कोणी नसून तिचे वडील असल्याचं निष्पन्न झालं. शुक्रवारी पोलिसांनी मुलीची आई काजल देवी आणि वडील भरत यादव यांना चौकशीसाठी बोलावले होतं. 8 ते 9 तास पोलिसांनी दोघांची चौकशी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शुक्रवारी रात्री काजलला चौकशीनंतर सोडून दिलं. मात्र, भरत यादव याची सतत चौकशी केली. आधी भरत यादवने पोलिसांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विश्वासात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता संपूर्ण वास्तव समोर आलं. भरत यादवने पोलिसांना सांगितलं की, लहानपणापासून आंशीच्या हृदयाला छिद्र होतं. तिच्या उपचारावर लाखो रुपये खर्च झाले होते.
पतीने ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यापासून रोखलं; रागात पत्नीने खोलीचा दरवाजा लावला अन्..मृतदेहच बाहेर आला
पाहता पाहता आपण कर्जात बुडाल्याचं त्याने सांगितलं. त्याने पत्नीचे दागिनेही गहाण ठेवले होते. पण मुलगी बरी होऊ शकली नाही. आरोपीने सांगितलं, की तो गरीब झाला होता आणि मुलीला मारण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आरोपी पुढे म्हणाला की, मला एक मुलगा आहे आणि त्याला शिक्षण देऊन जीवनाचे आयुष्याची गाडी पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. भरत यादवने सांगितलं, की मुलगा काजलसोबत झोपला होता. पत्नी बाथरुममध्ये गेल्यावर त्याने आंशीला उचललं आणि आधीच तयार केलेल्या फासात बांधून तिची हत्या केली.
भरतने सांगितलं की, त्यानंतर त्याने आंशीला डालडाच्या डब्यात लपवलं. पत्नी बाथरूममधून परतल्यावर तिने मुलीचा शोध सुरू केला. मुलगी न सापडल्याने ती रडू लागली, त्यानंतर वडिलांनीही मुलीला शोधण्याचं नाटक केलं. कुटुंबीयांच्या दबावाखाली पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर बालिकेचा मृतदेह डालडाच्या डब्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली असून शनिवारी त्याची कारागृहात रवानगी करण्यात येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.