हिरोशिमा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे G-7 च्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्रपती जो. बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांच्या ऑटोग्राफची मागणी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे. पीएम मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाता यावे यासाठी देशातील प्रमुख नागरिकांकडून विनंत्यावर विनंत्या येत आहे. यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झाल्याचं बायडन म्हणाले.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांकडूनही कौतुक
अशीच काहीसी परिस्थिती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी त्यांच्या देशात असल्याचं म्हटलं आहे. ते यावेळी बोलताना म्हणाले की, पीएम मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाता यावे यासाठी देशातील प्रमुख नागरिकांकडून आपल्याला विनंती करण्यात येत आहे. मात्र या सर्वांना कार्यक्रमात कसं सहभागी करून घ्यायचं हा आमच्या पुढे प्रश्न आहे. शनिवारी अमेरिकेचे राष्ट्रपती जो. बायडन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हा किस्सा मोदींना सांगितला. वृत्तसंस्था एएनआयने ही माहिती सुत्रांच्या हवाल्यानं सांगितली आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता, स्थिरता आणि समृद्धी आणण्यासाठी G-7 शिखर परिषद हे एक महत्तवाचं व्यासपीठ आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, इंडो -पॅसिफिक क्षेत्राचं यश आणि सुरक्षा संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. यासाठीच G-7 महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.