मुंबई, 11 एप्रिल : ‘ही भाजपची चाल आहे, हळूहळू ते बाळासाहेब ठाकरे यांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. बाळासाहेबांचं नाव लोकांच्या मनातून काढून टाकतील. ज्यांच्याकडे नेतृत्व नाही, त्यांना चोरीची गरज लागते. यांचा एकही नेता स्वातंत्र्य संग्रामामध्ये नव्हता, त्यांनी सहभाग घेतला नाही. त्यामुळे ते एक एक आदर्श चोरी करत आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
‘बाबरी पाडण्यात शिवेसेनेची बाळासाहेब ठाकरेंची भूमिका नव्हती’ या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
‘राज्यपाल आणि मुख्यमंत्री पद हे मोठे आहे. पण आमचे हे मिंधे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्यासोबत गेले. त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घेतला पाहिजे नाहीतर स्वत: मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आता ते कुणाला जोडे मारणार आहे, किंवा त्याच जोड्याने तोंड फोडून घेणार आहात. बाळासाहेबांचा एवढा अपमान केला आहे. तुम्हाला काय चाटायचं ते चाटा पण बाळासाहेबांचं नाव घेऊ नका. हे बाळासाहेबांचे विचार नाही. ज्या मस्तीमध्ये चंद्रकांत पाटील बोलत आहे, त्यांनी अडवाणींची मुलाखत पाहावी. अडवाणी सुद्धा बोलले होते, घुमटावर जी लोक चढली होती, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘बाळासाहेबांचा इतका अपमान झाला नाही. आता बाळासाहेबांचे नाव घेऊ नका. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच भाजप हा भारतीय जनता पक्ष नव्हे तर भरकटलेला जनता पक्ष असा आहे. या भरकटलेल्या पक्षासोबत किती दिवस बसणार असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.