नागपूर, 27 एप्रिल : सध्या राज्यात मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये रामगिरी निवासस्थानी अर्धातास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे एकाच गाडीतून कार्यक्रमस्थळी रवाना झाले. राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोंडीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
भेटीचं कारण गुलदस्त्यात
तुमच्या शहरातून (नागपूर)
आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. रामगिरी या निवास्थानी दोघांमध्ये अर्धातास चर्चा झाली. चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र सध्या राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पहाता या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.